पिकाची उगवणशक्‍ती वाढविण्यासाठी काय करावे? जाणून घ्या अधिक | पुढारी

पिकाची उगवणशक्‍ती वाढविण्यासाठी काय करावे? जाणून घ्या अधिक

  • सर्व डाळींपेक्षा उडदामध्ये फॉस्फरीक आम्लाचे प्रमाण अधिक असते.
  • हरभर्‍याच्या कोवळ्या पानात मॅलिक आम्ल आणि ऑक्झॅलिक आम्ल असते.
  • तिळास तेलबियांची राणी असे संबधतात.
  • अंबाडी हे एक तंतुमय पीक असून या पिकाचा उपयोग चटया, दोर, पिशव्या, मासे पकडण्याची जाळी यासाठी केली जातो.
  • ज्यूटला सुवर्णतंत असेही म्हणतात. कारण त्यापासून सर्वात जास्त परकीय चलन मिळते.
  • शुगरबीट हे जगातील दुसरे मुख्य साखरवर्गीय पीक आहे.
  • भारत हा हळदीचे उत्पादन करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के उत्पादन
  • एकट्या भारतात होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांत हळद लागवड जास्त प्रमाणात आहे.
  • आले पिकाखाली सर्वात जास्त क्षेत्र केरळ राज्यात आहे. आल्यातील जिंजेरॉल या घटकामुळे आले तिखट लागते. भारतीय आल्यात 2.5 टक्के तेल असते.
  • टॅपिओका कंदावर प्रक्रिया करून स्टार्च तयार करतात आणि स्टार्चपासून साबुदाणा, नायलॉन पोहे, ग्लुकोज आणि अल्कोहोल तयार करतात.
  • मक्यामध्ये 3-7 टक्के एवढे तेलाचे प्रमाण असते. हे तेल हृदयरोगावर आशादायक उपचार म्हणून पुढे येत आहे.
  • भात हे जगातील सर्वात महत्त्वाचे तृणधान्य पीक असून 60 टक्के लोकांचे मुख्य अन्‍न आहे. गव्हाच्या पिठामधील प्रथिनांमध्ये असलेल्या
  • ग्लुटेन आणि लायसिन यामुळे ब्रेड वजनाने हलका आणि सच्छिद्र होण्यास मदत होते.
  • गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन पंजाबमध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे पंजाबला गव्हाचे कोठार असे म्हणतात.
  • सोडाखार मिश्रण पद्धत आणि मलबारी पद्धत या सुंठ तयार करण्याच्या पद्धती आहेत.
  • कांदा बिजोउत्पादनासाठी कांद्याची लागवड ऑक्टोबर शेवट ते नोव्हेंबर पहिला आठवडा या कालावधीत केली असता जास्तीत जास्त बियाणे मिळते.
  • पिकाची उगवणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि पिके कीड आणि रोगमुक्‍त ठेवण्यासाठी बी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
  • सुरती जातीच्या म्हशीची शिंगे कोयत्याच्या आकाराची असतात.
  • वराहाची मादी एका वेळी सरासरी 10 ते 12 पिलांना जन्म देते.
  • अतिपक्‍व फळात पेक्टीनचे प्रमाण कमी असते म्हणून जेलीसाठी अपरिपक्‍व फळे वापरू नयेत.
  • म्हशीच्या दुधात स्निग्धांश गाईच्या दुधापेक्षा जास्त असल्यामुळे म्हशीच्या दुधाचे विशिष्ट गुरुत्व जास्त असते.
  • धान्यास मोकळी हवा लागून धान्याचे तापमान कमी राखण्यासाठी धान्याच्या पोत्यांच्या थप्पी भिंतीपासून 60 सेंटीमीटर अंतरावर असाव्यात.

– जयदीप नार्वेकर

Back to top button