MI vs LSG : मुंबईच्या पराभवाच्या अष्टमीनं रोहित शर्मा हैराण, म्हणाला…

MI vs LSG : मुंबईच्या पराभवाच्या अष्टमीनं रोहित शर्मा हैराण, म्हणाला…

पुढारी ऑनलाईन डेस्क : के. एल. राहुलचे दमदार अर्धशतक आणि आक्रमक गोलंदाजीच्या बळावर लखनौने मुंबईचा ३६ धावांनी धुव्वा उडवला. हा मुंबई इंडियन्सचा सलग आठवा पराभव आहे. आयपीएल २०२२ च्या या हंगामात मुंबई इंडियन्सला अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. (MI vs LSG)

लखनौकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला आहे की, आमच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशाजनक प्रदर्शन केले. आम्ही चांगली गोलंदाजी करत लखनौच्या संघाला कमी धावसंख्येत रोखले होते. मात्र आम्ही चांगली फलंदाजी करू शकलो नाहीत. खराब शॉट सिलेक्शनने विकेट्स पडत गेल्या. त्यामुळे आम्हाला चांगली भागिदारी करू शकलो नाही.

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, फक्त आजचा सामनाच नाही तर या संपूर्ण हंगामात आम्ही खराब फलंदाजी केली आहे. कोणत्याही फलंदाजाने जबाबदारी घेत चांगली फलंदाजी केली नाही. या पुर्ण हंगामात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांची कामगिरी सुमार राहिली आहे. आयपीएल २०२२ मध्ये मुंबईकडून फक्त सुर्यकुमार यादवने चांगली कामगिरी केली. तर गोलंदाजांमध्ये जसप्रित बुमराहने चमक दाखवली. मुंबईच्या संघातील इतर कोणीही चांगली कामगिरी करू शकलेले नाही. (MI vs LSG)

 हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news