

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलनंतर लगेच भारत वि. दक्षिण टी-२० मालिका रंगणार आहे. बीसीसीआयने भारत-विरूद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका कधी आणि कोठे खेळवल्या जाणार याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. २९ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. यानंतर लगेच ९ जून पासून भारत वि. दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेला सुरूवात होईल. (IND vs SA)
गुरूवार – ९ जून २०२२ – पहिला टी-२० सामना – दिल्ली
रविवार – १२ जून २०२२ – दुसरा टी-२० सामना – कटक
मंगळवार – १४ जून २०२२ – तिसरा टी-२० सामना विशाखापट्टणम
शुक्रवार – 17 जून-२०२२ – चौथा टी-२० सामना – राजकोट
रविवार – 19 जून २०२२ – पाचवा टी-२० सामना – बंगळूर
कोरोनाच्या प्रादुर्भामुळे दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा काही काळासाठी रद्द करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ यापुर्वी भारत दौऱ्यावर आला असता एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळवली गेली होती. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे टी-२० मालिका पुढे ढकलण्यात आली होती. भारताची ही या वर्षातील तिसरी टी-२० मालिका आहे. या अगोदर श्रीलंका आणि वेस्टइंडिज विरूद्ध भारताची टी-२० मालिका झाली होती. (IND vs SA)