IPL 2022 : CSK च्या गोटात ‘या’ श्रीलंकन वेगवान गोलंदाजाची एन्ट्री! | पुढारी

IPL 2022 : CSK च्या गोटात ‘या’ श्रीलंकन वेगवान गोलंदाजाची एन्ट्री!

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) संघात एका नव्या खेळाडूची एन्ट्री झाली आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिल्नेच्या दुखापतीनंतर त्याच्या जागी सीएसकेने मथिशा पाथिरानाचा संघात समावेश केला आहे. चेन्नईच्या सलामीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध खेळताना मिल्नेला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडवे लागले होते. (IPL 2022)

मिल्नेच्या जागी सीएसके संघात सामील झालेला पाथिराना हा 19 वर्षीय श्रीलंकेचा मध्यमगती गोलंदाज आहे. 2020 आणि 2022 मध्ये मथिशा पाथिराना श्रीलंकेच्या अंडर 19 विश्वचषक संघाचा भाग होता. सीएसकेने त्याला 20 लाखांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे. (IPL 2022)

आयपीएलमधील बदली खेळाडूंच्या यादीत समाविष्ट होणारा पाथिराना हा सहावा खेळाडू ठरला आहे. तथापि, सीएसकेने अद्याप दीपक चहरच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. चेन्नईने चहरला 14 कोटी रुपये खर्चून आपल्या संघात घेतले होते, मात्र दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चेन्नई व्यतिरिक्त, राजस्थान रॉयल्सने देखील नॅथन कुल्टर-नाईलच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही. (IPL 2022)

TATA IPL 2022 मधील बदली खेळाडूंची आतापर्यंतची यादी –

गुजरात टायटन्स : जेसन रॉय/रहमानुल्ला गुरबाजी
कोलकाता नाईट राइडर्स : ॲलेक्स हेल्स/ॲरोन फिंच, रसिक दरो/हर्षित राणा
लखनऊ सुपर जाइंट्स : मार्क वुड/एंड्रयू टाय
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : लवनीथ सिसोदिया/रजत पाटीदारी
राजस्थान रॉयल्स : नाथन कूल्टर-नाइल/ ??
चेन्नई सुपर किंग्स : एडम मिल्ने/मथीशा पथिराना, दीपक चाहर/ ??

Back to top button