DC vs PBKS : दिल्लीचा पंजाबवर एकतर्फी विजय

DC vs PBKS : दिल्लीचा पंजाबवर एकतर्फी विजय
Published on
Updated on

मुंबई ; वृत्तसंस्था : गोलंदाजांच्या प्रभावी मार्‍यानंतर डेव्हिड वॉर्नर (नाबाद 60) व पृथ्वी शॉ (41) यांच्या वादळी फलंदाजीच्या बळावर कोरोनाशी लढत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने (DC vs PBKS) पंजाब किंग्जवर तब्बल 57 चेंडू बाकी असताना 9 विकेटस् राखून एकतर्फी विजय मिळविला. याबरोबरच 2 गुणांची कमाई करत दिल्लीने आयपीएल 2022 च्या गुणतक्त्यात 6 व्या स्थानी झेप घेतली.

विजयासाठी 116 धावांचे टार्गेट नजरेसमोर ठवून मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 10.3 षटकांत 1 बाद 119 धावा काढून विजयावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीच्या पृथ्वी शॉ व वॉर्नरने आक्रमक सुरुवात केली. वॉर्नरने रबाडाला चौकार ठोकत अवघ्या 21 चेंडूंत दिल्लीचे अर्धशतक पूर्ण केले. या जोडीने पाचव्या षटकात संघाला बिनबाद 75 अशी स्फोटक सुरुवात दिली.

यावेळी पृथ्वी 35 तर वॉर्नर 36 धावांवर खेळत होते. हीच जोडी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार असे वाटत असतानाच राहुल चहरने पृथ्वीला इल्लिसकरवी झेलबाद केले. पृथ्वीने 20 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 41 धावा काढल्या. दिल्लीला पहिला धक्का 83 धावांवर बसला. (DC vs PBKS)

पृथ्वी परतल्यानंतर आलेल्या सर्फराजने वॉर्नरच्या साथीने नवव्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. तर वॉर्नरने आपले अर्धशतक 26 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने पूर्ण केले. तर त्यानेच चौकार मारत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अर्धशतकासह वॉर्नर 60 तर सर्फराज 12 धावांवर नाबाद राहिले. पंजाबच्या वतीने राहुल चहरने एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत सर्वबाद 115 धावा काढल्या. सलामी फलंदाज मयंक अग्रवाल आणि शिखर धवन हे पुन्हा एकदा संघाला दमदार सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले. धवन 10 चेंडूंत अवघ्या 9 धावा काढून बाद झाला. तर मयंक (24) याला चांगली सुरुवात मिळूनही मोठी खेळी करण्यास अपयश आले. धवनला ललितने तर मंयकला मुस्तफिजुर रेहमानने बाद केले.

दोन्ही सलामी फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्याची जबाबदारी असताना मधल्या फळीतील जॉनी बेअरस्टो व लिविंगस्टोन यांनी निराशाच केली. बेअरस्टो 9 तर लिविंगस्टोन अवघ्या 2 धावा काढून बाद झाला. एका बाजूने चेंडूवर नजर बसलेल्या जितेश शर्माचा अडसर अक्षर पटेलने दूर केला. जितेशने 23 चेंडूंत 32 धावांची खेळी केली. यामुळे पंजाबची स्थिती 5 बाद 85 अशी बिकट झाली.

जितेश परतल्यानंतर कागिसो रबाडाला (2) कुलदीप यादवने त्रिफळाबाद केले. त्यानंतर नॅथन इल्लिसलाही कुलदीपने त्रिफळाबाद करत एकाच षटकात दोन विकेट घेत पंजाबची 7 बाद 90 अशी स्थिती केली. यामध्ये अवघ्या 2 धावांची भर पडली असताना मुख्य फलंदाज शाहरूख खानही अवघ्या 12 धावा काढून परतला. त्यानंतर राहुल चहरने 12 धावांचे योगदान दिल्याने पंजाबचे शतक पूर्ण झाले. तर शेवटच्या चेंडूवर अर्शदिप सिंग (9) धावबाद झाला. यामुळे पंजाबने सर्वबाद 115 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीच्या वतीने खलिल अहमद, ललित यादव, अक्षर पटेल व कुलदीप यांनी प्रत्येकी 2 विकेटस् घेतल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news