bicycle rider : शर्यत जिंकण्याची अनोखी ट्रिक; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क !

bicycle rider : शर्यत जिंकण्याची अनोखी ट्रिक; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क !
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सायकलवर स्टंट (bicycle rider) करतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कोणी एका पॅडलवर उभे राहून सायकल चालवण्यात माहिर आहे, तर कोणी दोन्ही हात सोडून सायकल चालवू शकतो, पण आपण ज्या सायकलस्वाराबद्दल बोलत आहोत. त्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे. तो सायकलवर न बसता झोपून सायकल चालवतो. इतकंच नाही तर हे करत असताना सायकलचा वाढणारा वेग देखिल पाहण्याजोगा आहे. अशा अनोख्या ट्रिकने या सायकल पटूने स्पर्धतेतील बाकीच्या सायकलस्वारांना मागे टाकून ही शर्यतही जिंकली. त्याने ज्या पद्धतीने स्पर्धा जिंकली त्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सायकलस्वाराने साधले अप्रतिम संतुलन (bicycle rider)

अमेझिंग फिजिक्स (Amazing Physics) नावाच्या ट्विटर हँडलने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सायकल शर्यत सुरू आहे, जी जिंकण्यासाठी रायडर्स आपले जीव पणाला लावत आहेत. या शर्यतीत मागे एक सायकलस्वार दिसतो आहे. पिवळ्या पोशाखात दिसणारा हा सायकल पटू सुरुवातीला इतर रेसर्सप्रमाणे सायकलचे पेडलला मारतो आहे. पण तो थोड्यावेळाने प्रयत्न करायचे बंद करतो, कारण शर्यत जिंकण्याची त्याची योजना काहीशी वेगळी असते.

पेडलिंग करत असताना अचानक हा सायकल पटू (bicycle rider) चालत्या सायकलवर पेडलिंग थांबवून झोपण्याचा प्रयत्न करताना दिसतो. आश्चर्यकारक संतुलन दाखवत, तो या प्रयत्नात यशस्वी होतो. सायकलस्वाराचा हा स्टंट धक्कादायक होता. पण, खरी आश्चर्याची बाब त्यानंतर समोर येते. सायकलवर झोपलेला असताना, हा रायडर इतर रेसर्सना हुशारीने मागे टाकतो. इतकंच नाही तर हा रेसर सायकलवर झोपून सुद्धा शर्यतीच्या पुढे धावणारी स्कूटरलाही मागे टाकतो.

व्हिडिओवर प्रतिक्रिया (bicycle rider)

अमेझिंग फिजिक्सने (Amazing Physics) ने साइक्लिंग + फिजिक्स = विनर या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर लोक सतत कमेंट करत आहेत. काहींनी या सायकलस्वाराचे जिनियस असे वर्णन केले आहे, तर काहींनी सायकलस्वाराने फसवणूक केल्याचे म्हंटले आहे. शर्यतीचे नियम काय म्हणतात हा वेगळा मुद्दा आहे. पण, रायडरने अशाप्रकारे सायकल चालवून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे, हे निश्चित.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news