MS Dhoni : धोनीला दणका, IPL ने ‘ती’ जाहिरात मागे घेतली | पुढारी

MS Dhoni : धोनीला दणका, IPL ने ‘ती’ जाहिरात मागे घेतली

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामाची सुरुवात महेंद्रसिंग धोनीसाठी काहीही चांगली झालेली नाही. त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने पहिले सलग तीन सामने गमावले आहेत. त्यातच आता धोनीला आणखी एक धक्का बसला आहे. आयपीएलच्या प्रमोशनसाठी बनवलेली एक खास जाहिरात ज्यात एमएस धोनी (MS Dhoni) होता, त्या जाहिरातीवर बंदी घालण्यात आली आहे.

अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने (ASCI) आयपीएलला महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अभिनीत केलेली जाहिरात मागे घेण्यास सांगितले आहे. रोड सेफ्टी ऑर्गनायझेशनने तक्रार केल्यानंतर ASCI ने ही शिफारस केली आहे.

एका इंग्रजी दैनिकाच्या रिपोर्टनुसार, आयपीएलच्या प्रमोशनसाठी बनवण्यात आलेल्या जाहिरातीविरोधात कन्झ्युमर युनिटी अँड ट्रस्ट सोसायटी (CUTS)ने ही तक्रार दाखल केली होती. ही एक रस्ता सुरक्षा संस्था आहे. ही जाहिरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी असल्याचे CUTS ने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. (MS Dhoni)

जाहिरात मागे घेणार

तक्रारीनंतर, अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI)ने IPL गव्हर्निंग कौन्सिलला ही जाहिरात काढून टाकण्यास सांगितले आहे. ASCI कडे तक्रार आल्यानंतर ग्राहक तक्रार समिती (CCC) च्या सदस्यांनी ही जाहिरात पाहिली. यानंतर या जाहिरातीत नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यानंतर आयपीएलला २० एप्रिलपर्यंत ही जाहिरात काढून टाकण्याचे किंवा त्यात बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयपीएलने ते मान्य केले आहे आणि जाहिरात काढून टाकण्याचे लेखी हमीपत्र दिले आहे. (MS Dhoni)

धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला होता. या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘आयपीएलचा विचार केल्यास चाहते सामना पाहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. कारण #YehAbNormalHai!, या नवीन सीझनकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत.’

Back to top button