IPL 2022 : चेन्नईला ‘या’ खेळाडूला रिटेन केल्याचा फटका!

IPL 2022 : चेन्नईला ‘या’ खेळाडूला रिटेन केल्याचा फटका!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२२ हंगाममध्ये चेन्नई सुपर किंग्जला ३ सामन्यांत पराभवाला जावे लागले. त्यामुळे त्यांना अजूनतरी या हंगामात विजयाची चव चाखता आली नाही. सीएसके अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. सीएसकेचा या हंगामातील तिसरा सामना रविवारी मुंबईतील ब्रेब्रॉन स्टेडियमवर पंजाब किंग्जविरुद्ध खेळवण्यात आला. या सामन्यातही चेन्नईला मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईच्या अनुभवी खेळाडूंना अजून लय सापडली नसल्यामुळे सामन्यात पराभव पत्करावा लागत आहे. मेगा ऑक्शनच्यावेळी चेन्नईने ४ खेळाडूंना रिटेन केले होते. त्यापैकी एका महत्वाच्या अष्टपैलू खेळाडूला अजून चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे चेन्नईच्या अडचणीत वाढ झाली आहे.(IPL 2022)

आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी धोनी चेन्नईच्या कर्णधार पदावरून पायउतार झाला होता. त्यानंतर संघाच्या कर्णधार पदाची धुरा संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. कर्णधार पदाची धुरा हाती घेतल्यापासून जडेजाच्या नेतृत्वात चेन्नईने तीन सामने खेळले आहेत. या तीनही सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ( IPL 2022 )

एकीकडे जडेजाला कर्णधार म्हणून चांगली कामगिरी होईना तर चेन्नईचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अली ह्याला देखील अजून लय सापडलेली नाही. या मोसमात मोईन अलीवर संघाला सर्वाधिक विश्वास होता, सीएसकेने मोईनला ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते पण मोईन आतापर्यंत या मोसमात पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. मोईन आपल्या खेळीने ना फलंदाजीत, ना गोलंदाजीत चांगली खेळी करून संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे.

मोईन अली या हंगामात आतापर्यंत तरी अयशस्वी ठरला आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात मोईनला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात मोईनला संघात स्थान देण्यात आले मात्र दोन्ही सामन्यात मोईन काही विशेष कामगिरी करू शकला नाही. मोईनने या मोसमात आतापर्यंत २ सामन्यांत केवळ ३५ धावा केल्या असून पंजाबविरुद्ध मोईन ० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या दोन सामन्यांमध्ये मोईनने एकही बळी घेतलेला नाही आणि त्याने गोलंदाजी करताना ११ च्या सरासरीने धावा दिल्या आहेत.

मोईन अलीने आयपीएल २०२१ च्या हंगामात बॉलिंग आणि धडाकेबाज फलंदाजीने सर्वांची मने जिंकली होती. मोईनने १५ सामन्यात ३५७ धावा ठोकल्या होत्या. त्याचवेळी त्याने गोलंदाजी करत ६ विकेट देखील घेतले होते. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत त्याने संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. फलदाजी आणि गोलंदाजीने सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता मोईनकडे आहे. मात्र या मोसमात आतापर्यंत मोईनला असे करण्यात अपयश आले आहे

चेन्नई 9व्या स्थानावर

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२२ हंगामाच्या गुणतालिकेत 9व्या स्थानावर घसरला आहे. चेन्नईला लीगच्या चालू मोसमात सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्जने हंगामाच्या सुरुवातीला सलग 3 सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात केकेआरने संघाचा पराभव केला होता, दुसऱ्या सामन्यात सीएसकेचा लखनौ सुपरजायंट्सकडून पराभव झाला होता आणि तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news