MI vs RR : राजस्थानची मुंबईवर २३ धावांनी मात | पुढारी

MI vs RR : राजस्थानची मुंबईवर २३ धावांनी मात

पुढारी ऑनलाईन डेस्क :मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान संघाने निर्धारित २० षटकांत आठ गडी गमावून १९३ धावा केल्या. विजयासाठीच्या १९४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ ८ बाद १७० धावांपर्यंत मजल मारू शकला.

तिलक वर्माचे अर्धशतक

तिलक वर्माने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले.

मुंबईची तिसरी विकेट पडली

इशान किशन अर्धशतकांनंतर (54) बाद झाला. त्यच्या रुपात मुंबईला तिसरा झटका बसला. या हंगामातील सलग दुसरे अर्धशतक झळकावल्यानंतर किशन बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या चेंडूवर नवदीप सैनीने सर्वोत्तम झेल घेत त्याला बाद केले. किशनने 43 चेंडूत 54 धावा केल्या. त्याच्या खेळीत पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. आता वेगवान धावा करण्याची जबाबदारी तिलक वर्मा यांच्यावर असेल.

इशान किशनचे अर्धशतक

इशान किशनने आयपीएल कारकिर्दीतील 11वे अर्धशतक पूर्ण केले. या मोसमातील त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. त्याने 41 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या.

मुंबईची धावसंख्या शंभरी पार

इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी मिळून मुंबईची धावसंख्या दोन विकेट्सवर 100 च्या पुढे नेली. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. दरम्यान, यशस्वी जैस्वालने ईशान किशनचा अवघड झेल सोडला. हा झेल राजस्थान संघाला जड ठरू शकतो. जैस्वालने हा झेल पकडला असता तर आरआरने सामन्यात पुनरागमन केले असते.

इशान किशन आणि टिळक वर्मा यांच्यात अर्धशतकी भागीदारी

इशान किशन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी मिळून 33 चेंडूत 50 धावा केल्या. वर्मा आता आक्रमक फलंदाजी करत आहेत. त्याने चहलच्या एका षटकात 12 धावा देत आपल्या संघाला या सामन्यात रोखले. वर्मा 37 आणि किशन 40 धावांवर खेळत आहेत.

मुंबईची पहिली विकेट पडली

प्रसिद्ध कृष्णाने मुंबई इंडियन्सला पहिला धक्का दिला. त्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितने पाच चेंडूत एका षटकाराच्या मदतीने 10 धावा केल्या. रियान परागने त्याचा झेल टिपला.

सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर रियान परागने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क फारसा विशेष नव्हता आणि टीम डेव्हिडने डीप मिड-विकेटवर शानदार झेल घेतला. यासह राजस्थान संघाला आठ विकेटच्या मोबदल्यात १९३ धावाच करता आल्या. राजस्थान रॉयल्सने सलग दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शानदार खेळ दाखवला. संजू सॅमसन, देवदत्त पडिक्कल या खेळाडूंनी पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी केली. दुसऱ्या सामन्यात जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली. राजस्थानच्या भक्कम गोलंदाजीसमोर या लक्ष्याचा पाठलाग करणे मुंबईसाठी सोपे नसेल.

राजस्थानची सातवी विकेट

टायमल मिल्सने राजस्थानला सातवा धक्का दिला. त्याने नवदीप सैनीला यष्टिरक्षक इशान किशनकरवी झेलबाद केले. नवदीप दोन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

19व्या षटकात तीन फलंदाज बाद

राजस्थानचा संघ 19व्या षटकात गडगडला आणि 200 पेक्षा जास्त धावा करण्याचे त्यांचे स्वप्न धूसर झाले. जसप्रीत बुमराहने 19 व्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने फक्त तीन धावा दिल्या आणि दोन सेट फलंदाजांना बाद केले. तर एक फलंदाज धावबाद झाला.

बुमराहने एका ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या

जसप्रीत बुमराहने एकाच षटकात राजस्थानला दोन धक्के दिले आणि 200 पेक्षा जास्त धावा करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. हेटमायरनंतर त्याने यॉर्कर चेंडूवर बटलरलाही बाद केले. बटलरने ११ चौकार ५ षटकारांच्या मदतीने ६८ चेंडूत १०० धावा केल्या.

हेटमायरचे अर्धशतक हुकले

जसप्रीत बुमराहने राजस्थानला चौथा धक्का दिला. त्याने शिमरॉन हेटमायरला 35 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने 14 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि तीन षटकार मारले.

बटलरने आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठोकले

जोश बटलरने IPL 2022 चे पहिले शतक झळकावले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे शतक आहे.

हेटमायरची धडाकेबाज फलंदाजी

पाचव्या क्रमांकावर असलेल्या शिमरॉन हेटमायरने शानदार फलंदाजी केली आहे. त्याने झटपट धावा केल्या आणि बटलरसोबत १९ चेंडूंत पन्नास धावांची भागीदारी केली.

राजस्थानला तिसरा झटका..

पोलार्डने राजस्थानला तिसरा धक्का दिला. त्याने कर्णधार संजू सॅमसनला टिळक वर्माकरवी झेलबाद केले. सॅमसनने तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ३० धावा केल्या.

पॉवरप्लेमध्ये राजस्थानच्या ४८ धावा

पॉवरप्लेमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने २ गडी गमावून ४८ धावा केल्या. सलामीवीर जोश बटलरने आक्रमक फलंदाजी करत ४० धावांचे योगदान दिले. तर यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडिक्कल स्वस्तात बाद झाले.

रोहितचे १५० झेल

या सामन्यातील एका झेलसह रोहित शर्माने टी-20 क्रिकेटमधील 150 झेल पूर्ण केले. या फॉरमॅटमध्ये 150 झेल घेणारा रोहित भारताचा चौथा खेळाडू ठरला आहे. हिटमॅनच्या आधी एमएस धोनी (200), दिनेश कार्तिक (192) आणि सुरेश रैना (172) यांची क्रमांक लागतो.

राजस्थानची दुसरी विकेट

टायमल मिल्सने राजस्थानला दुसरा धक्का दिला. त्याने देवदत्त पडिक्कलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पडिक्कलने सात चेंडूत सात धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. कर्णधार रोहितने त्याचा झेल टिपला.

थम्पीच्या एका षटकात २६ धावा

यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर जोश बटलरने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने बासिल थम्पीच्या एका षटकात २६ धावा कुटल्या. यादरम्यान त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. यावेळी राजस्थानची धावसंख्या चार षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ४३ होती.

राजस्थानची पहिली विकेट

राजस्थान संघाची पहिली विकेट तिस-या षटकात पडली. जसप्रीत बुमराहने यशस्वी जैस्वालला एका धावेवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीम डेव्हिडने त्याचा झेल घेतला. यावेळी तीन षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या एका विकेटवर १७ धावा होती.

मुंबईचा कर्णधार रोहितने संघात कोणताही बदल केलेला नाही. सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघात पुनरागमन करेल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र तसे झाले नाही. दुसरीकडे राजस्थानच्या संघात एक बदल करण्यात आला आहे. नॅथन कुल्टर-नाईलच्या जागी नवदीप सैनीचा संघात समावेश करण्यात आला आहे. राजस्थानसाठी त्याचा हा पहिलाच सामना आहे.

राजस्थान प्लेइंग इलेव्हन (RR) :

जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पड्डीकल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रणीक कृष्णा.

मुंबई प्लेइंग इलेव्हन (MI) :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी.

आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एकूण २५ सामने खेळले गेले आहेत. यातील १३ सामने आरआरने तर ११ सामने एमआयने जिंकले आहेत. तर १ सामना निकालाविना संपला. मुंबईने २०१० मध्ये राजस्थानविरुद्ध एका डावात सर्वाधिक २१२ धावा केल्या होत्या, तर त्याची सर्वात कमी धावसंख्या ९२ होती. राजस्थानने मुंबईविरुद्ध एका डावात सर्वाधिक २०८ धावा केल्या आहेत आणि त्यांची सर्वात कमी धावसंख्या ९० आहे. या दोघांच्या टक्करमध्ये संजू सॅमसनने सर्वाधिक ४१६ धावा केल्या आहेत. यानंतर ३१६ धावा करणाऱ्या रोहित शर्माचा क्रमांक लागतो.

Back to top button