आयपीएल 2022 : सूर्यकुमार पहिल्या सामन्याला मुकणार? | पुढारी

आयपीएल 2022 : सूर्यकुमार पहिल्या सामन्याला मुकणार?

मुंबई ; वृत्तसंस्था : 26 मार्चपासून आयपीएल-2022 ला सुरुवात होणार आहे. मुंबई, नवी मुंबई व पुणे येथे साखळी फेरीचे सामने खेळविण्यात येणार आहेत. अशात आता मुंबई इंडियन्सची काळजी वाढवणारी बातमी समोर येत आहे. मुंबईचा सूर्यकुमार यादव 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत खेळणार नसल्याची शक्यता बळावली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत त्याला दुखापत झाली होती. ‘सूर्यकुमार यादव सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरण्यासाठी गेला आहे. परंतु आयपीएल-2022 मधील पहिला सामना खेळण्याची शक्यता फार कमी आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याला सलामीचा सामना खेळून दुखापतीबाबत उगाच धोका पत्करू नकोस, असा सल्ला देऊ शकते.

27 मार्चनंतर मुंबई इंडियन्स दुसरा सामना 2 एप्रिलला राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळणार आहे. सूर्यकुमारला अंगठ्याच्या दुखापतीतून सावरण्यासाठी अतिरिक्‍त पाच दिवस मिळत आहेत. त्यामुळे तो दुसरा सामना खेळण्याची शक्यता आहे.

Back to top button