Hugh Edmeades : IPL लिलावात बेशुद्ध पडलेल्या ह्यूग यांनी 36 वर्षांच्या कारकिर्दीत 3 लाख वस्तूंचा केला लिलाव | पुढारी

Hugh Edmeades : IPL लिलावात बेशुद्ध पडलेल्या ह्यूग यांनी 36 वर्षांच्या कारकिर्दीत 3 लाख वस्तूंचा केला लिलाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेक्स्ट प्लेयर इज ‘श्रेयस अय्यर’… ॲण्ड इट्स बेस प्राइस इज रुपीज् 2 करोड.. आयपीएल 2022 च्या लिलावादरम्यान (IPL Auction) प्रत्येक खेळाडूच्या लिलावापूर्वी हा आवाज ऐकू येत आहे. या आवाजाची जादू अशी आहे की खेळाडूंना बोली लावताच पुढच्या काही वेळात त्यांना मूळ किमतीपेक्षा 5-6 पट जास्त किंमत मिळत आहेत. हा आवाज आहे ऑक्शनियर ह्यूग एडमिड्स (Hugh Edmeades) यांचा. आयपीएलचा लिलाव सुरू असताना ह्यूग एडमिड्स अचानक डायसवरून खाली पडले. त्यावेळी ते श्रीलंकेचा खेळाडू वानिंदू हसरंगा याचा लिलाव करत होते.

63 वर्षीय ह्यूग एडमिड्स (Hugh Edmeades) यांना खेळाडूंची किंमत शक्य तितकी उचलण्याची हातोटी आहे. आयपीएलमध्ये लिलाव करण्याची ह्यूग एडमिड्स यांची ही चौथी वेळ आहे. आयपीएलच्या नवीन हंगामासाठी त्यांच्यावर 590 खेळाडूंचा लिलाव करण्याची जबाबदारी आहे. चलातर ह्यूग यांच्याबद्दल सविस्तर जाणून घ्या…

ह्यूग एडमिड्स (Hugh Edmeades) एक ब्रिटिश आंतरराष्ट्रीय ललित कला, क्लासिक कार आणि धर्मादाय लिलावकर्ता आहेत. 36 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 2500 लिलाव केले आहेत. यामध्ये त्यांनी 2.76 लाख कोटी रुपयांच्या 3 लाखांहून अधिक वस्तूंचा लिलाव केला आहे. त्यांनी ओल्ड मास्टर, इंप्रेशनिस्ट आणि कंटेम्पररी पेंटिंग्ज, उत्कृष्ट फर्निचर, चिनी मातीची भांडी, विविध कलाकृती, चित्रपट आणि क्रीडा विषयक संस्मरणीय वस्तूंसह विविध प्रकारच्या वस्तूंचा लिलाव केला.

ह्यूग यांनी ब्रिटीश लिलावगृह क्रिस्टीजमध्ये दीर्घकाळ काम केले आहे. क्रिस्टीच्या लिलावादरम्यान (IPL Auction)त्यांनी अनेक ऐतिहासिक संग्रहांचा लिलाव केला आहे. त्यांनी येथून राजकुमारी प्रिन्सेस मार्गारेट आणि माजी राणी एलिझाबेथ टेलर यांच्या अवशेषांचा लिलाव केला आहे. ह्यूग चित्रपटांशी संबंधित गोष्टींचा लिलाव करण्यासाठीही ओळखले जातात.

2004 मध्ये ह्यूग यांनी एरिक क्लॅप्टनच्या 88 गिटारचा लिलाव केला. यामध्ये एकूण 74 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली. डिसेंबर 2006 मध्ये त्यांनी ‘ब्रेकफास्ट अॅट टिफनी’ चित्रपटातील अभिनेत्री ऑड्रे हेपबर्नने परिधान केलेला एक काळा रंगाचा ड्रेस 4.67 लाख पौंड (सुमारे 4.80 कोटी)ला लिलाव केला. फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांनी ‘स्पेक्ट्रम’ या जेम्स बाँड चित्रपटातील मुख्य अभिनेते डॅनियल क्रेग याच्या Aston Martin DB10 कारचा 24.34 लाख पौंड (सुमारे 25 कोटी) मध्ये लिलाव केला.

‘लिलावा’साठी ह्यूग यांची स्वतःची वेबसाइट…

ह्यूग एडमिड्स यांनी www.hughedmeades.com ही स्वतःच्या नावाची वेबसाइटही तयार केली आहे. येथे त्यांनी आपल्या नावासोबत International Auctioneer असे लिहिले आहे. येथे ह्यूग यांनी त्याच्या कारकिर्दीशी संबंधित सर्व प्रमुख उपलब्धी लिहिल्या आहेत. सेवा वर्गात त्यांनी ललित कला, दान आणि उपयुक्तता यांचा उल्लेख केला आहे. आपले काम दाखवण्यासाठी त्यांनी टेस्टमोनिअलची एक श्रेणीही तयार केली आहे. एकप्रकारे हा त्यांच्या कार्याचा दाखला आहे.

ह्यूग एडमिड्स यांचे इन्स्टाग्राम अकौंटही आहे. येथे ते वेगवेगळ्या लिलावाशी संबंधित फोटो अपडेट करत राहतात. इन्स्टावर त्याचे 1,369 फॉलोअर्स आहेत. ते 781 लोकांना फॉलो करतात. आतापर्यंत त्यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर 51 पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या 2 व्हिडिओंचा समावेश आहे.

दुबई ते न्यूयॉर्क आणि भारतापर्यंत लिलाव केले…

ह्यूग एडमिड्स यांनी धर्मादाय लिलावासाठी दुबई, हाँगकाँग, कॅसाब्लांका, न्यूयॉर्क, मुंबई, मॉन्टे कार्लो, लॉस एंजेलिस आणि टोकियो यासह 30 हून अधिक शहरांना भेटी दिल्या आहेत. 2008 मध्ये नेल्सन मंडेला लंडनमध्ये 90 वा वाढदिवस साजरा करताना एका लिलावाचे आयोजन केले होते. या लिलावाचे लिलावकर्ता म्हणून ह्यूग एडमिड्स उपस्थिते होते. त्यांनी त्या लिलावाच्या कार्यक्रमात 4.3 मिलियन पौंडमध्ये आठ लॉट विकले.

2016 मध्ये त्यांनी क्रिस्टीजचा राजीनामा दिला आणि फ्रीलांसर लिलावकर्ता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये बीसीसीआयने त्यांना आयपीएल लिलावाची जबाबदारी दिली. आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव करण्याची ह्युग यांची ही चौथी वेळ आहे. ते अजूनही धर्मादाय आणि विविध कला क्षेत्रातील वस्तूंचा लिलाव करण्याच्या कार्यक्रमात लिलावकर्ता म्हणून काम करतात.

Back to top button