India vs South Africa 3rd ODI : द.आफ्रिकेचे भारतासमोर २८८ धावांचे आव्हान | पुढारी

India vs South Africa 3rd ODI : द.आफ्रिकेचे भारतासमोर २८८ धावांचे आव्हान

केपटाऊन ; पुढारी ऑनलाईन

India vs South Africa 3rd ODI क्विंटन डिकॉक आणि वॅन डॅर ड्यूसेन यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर द.आफ्रिकेने भारता समोर निर्धारित ५० षटकात २८८ धावांचे आव्हान दिले आहे. संपूर्ण सामन्यात डिकॉक आणि ड्युसेन यांच्या समोर ढेपाळलेल्या भारतीय गोलंदाजांना ४० व्या षटकानंतर सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. डिकॉक, ड्युसेन आणि फेहलुक्वायो यांना पाठोपाठ बाद करत भारताने खेळात पुनरागमन केले. यानंतर ठरावीक अंतरावर आफ्रिकेचे विकेट पडत राहिले. डेव्हीड मिलर याने मधल्या क्रमवारीत केलेल्या प्रतिकाराच्या जोरावर द. आफ्रिकेने सर्वबाद २८७ धावा करु शकला. अखेरच्या १० षटकात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत मोठी धावसंख्या उभा करु पाहणाऱ्या आफ्रिकेला भारताने २८७ मध्ये गुंडाळण्यात यश मिळवले.

India vs South Africa 3rd ODI पहिल्या सामन्यात धावांचा पाठलाग करु न शकलेल्या तसेच दुसऱ्या सामन्यात धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघ आफ्रिकेने दिलेल्या २८८ धावांचा पाठलाग करु शकतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारतीय कर्णधार केएल राहूलने ( India vs South Africa 3rd ODI ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाज दीपक चहर याने तिसऱ्याच षटकात जानेमन मलान याला बाद केले. किपर ऋषभ पंतकडे झेल देऊन मलान माघारी परतला. आफ्रिकेला बसलेल्या पहिल्या झटक्यानंतर क्विंटन डिकॉक याने टेम्बा बवुमा याच्या साथीने सावध सुरुवात करत स्कोरबोर्ड हालता ठेवला. या दरम्यान डिकॉकने काही मोठे फटके खेळत रनरेट कायम सहाच्या आसपास ठेवण्याचे काम केले. पण सहाव्या षटकात टेम्बा बवुमा धाव बाद झाला. यावेळी द. आफ्रिकेची अवस्था ३४ धावांत २ बाद अशी होती. मार्करम याच्या साथीने डिकॉकने आपली खेळी पुढे सुरु ठेवली. दीपक चहर याने १३ व्या षटकात जम बसवू पाहणाऱ्या मार्करमला झेल बाद केले. मार्करम याने १५ धावाची खेळी केली. यानंतर डिकॉकची साथ देण्यासाठी ड्युसेन मैदानात उतरला.

दरम्यान १८ व्या षटकात डिकॉक याने आपले अर्धशतक पूर्ण केले. डिकॉक आणि ड्युसेनने खेळपट्टीवर चांगलाच तळ ठोकला. दोन्ही फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांचा खरफूस समाचार घेतला. अखेर ३१ व्या षटकात क्विंटन डिकॉक याने आपले १७ वे एकदिवसीय शतक झळकावले. डिकॉकच्या पाठोपाठ ड्युसेन याने आपले अर्धशतक झळकावले. अखेर १४४ धावांची भागिदारी रचून डोकेदुखी ठरलेल्या डिकॉकला ३६ व्या षटकात बुमराहने बाद केले. डिकॉक शिखर धवनकडे झेल देऊन बाद झाला. त्याने आपल्या शतकी खेळीत १३० चेंडूत १२४ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १२ चौकारांसह २ षटकारांची आतषबाजी केली. डिकॉकच्या पाठोपाठ चहलने ड्यूसेन याला बाद केले. ड्यूसेन याने ५९ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. India vs South Africa 3rd ODI

पाठोपाठ दोन्ही जम बसलेल्या फलंदाजांना बाद करत भारताने सामन्यात पुनरागमन केले. या दोघांच्या पाठोपाठ आंदिले फेहलुक्वायो या फलंदाजाने केवळ हजेरी लावण्याचे काम केले. आंदिले फेहलुक्वायो हा धाव बाद झाला. तो केवळ ४ धावा करु शकला India vs South Africa 3rd ODI

यानंतर डेव्हीड मिलर याने खेळाची सुत्रे आपल्या हाती घेतली. परंतु त्याला अखेरच्या फलंदाजांनी फारशी साथ दिली नाही. ४८ व्या षटकात प्रिटोरियस २० धावा करुन बाद झाला. प्रसिद्ध कृष्णा याने त्याला बाद केले. पुढील ४९ व्या षटकात केशव महाराज ६ धावांवर बाद झाला. त्याला बुमराहने बाद केले. ५० व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मिलर मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. प्रसिद्ध कृष्णा याच्या गोलंदाजीवर विराट कोहली याने सीमारेषेवर मिलर झेल पकडला. मिलर याने ३८ चेंडू ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. शिवाय एक चेंडू बाकी असताना प्रसिद्ध कृष्णा याने मगाला याला बाद करत आफ्रिकेचा खेळ संपवला. या खेळीत आफ्रिकेने भारतासमोर २८८ धावांचे आव्हान ठेवले. India vs South Africa 3rd ODI

मागील दोन सामन्यासारखीच तिसऱ्या सामन्यात भारताची गोलंदाजी अगदी सुमार दर्जाची राहिली. पहिल्या बारा षटकात ३ बळी घेऊन सुद्धा भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर दबाव राखता आला नाही. सर्व गोलंदाजांना क्विंटन डिकॉक आणि ड्युसेन यांनी सहज खेळून काढत चांगल्या सरासरीने धावा बनवत राहिले. डिकॉक आणि ड्युसेन यांच्या नंतर बळी मिळविण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. प्रसिद्ध कृष्णा याने ३ बळी घेतले. दीपक चहर आणि बुमराहला प्रत्येकी २ बळी घेण्यात यश आले. चहल यांने १ बळी घेतला. जयंत यादव याने १० षटक टाकले पण त्याला कोणाचाही बळी घेता आला नाही. श्रयस अय्यर याने ३ षटके टाकात सहाव्या गोलंदाजाची भूमिका बजावली परंतु त्याला देखिल यश मिळाले नाही. अखेर शेवटच्या १० षटकात भारतीय गोलंदाजांनी पाठोपाठ बळी घेत आफ्रिकेचा संपूर्ण संघ माघारी धाडला..

LIVE UPDATE  : RSA 278/7 (47.5)  CRR: 5.81 ( India vs South Africa 3rd ODI )

 • द.आफ्रिकेने भारतासमोर ठेवले २८८ धावांचे आव्हान
 • शेवटच्या षटकातील १ चेंडू शिल्लक ठेवत आफ्रिकेचा संपूर्ण संघ २८७ धावा करुन माघारी परतला.
 • द.आफ्रिकेला बसला आठवा धक्का; ८ बाद २८२ धावा; केशव महाराज ६ धावा करुन ठरला बुमराहचा बळी
 • ड्वेन प्रिटोरिस याला प्रसिद्ध कृष्णाने केले झेल बाद. प्रिटोरिस याने २५ चेंडूत २० धावांची खेळी केली.
 • द.आफ्रिकेला बसला सातवा धक्का; ७ बाद २७२ धावा
 • ४६ षटकात द. आफ्रिकेच्या ६ बाद २६४ धावा
 • दक्षिण आफ्रिका ४४ षटकात ६ बाद २५३ धावा.
 • सरतेशेवटी भारताने सामन्यात पुनर्रागमन करण्याची संधी साधली आहे. ड्युसेन यांच्या नंतर आंदिले फेहलुक्वायो हा धाव बाद होत माघारी परतला. अशा तऱ्हेने आफ्रिकेला धक्के बसण्यात सुरुवात झाली आहे. मागील १४ धावांत आफ्रिकेचे ३ फलंदाज बाद करण्यात भारताला यश आले आहे. आंदिले फेहलुक्वायो ११ चेंडूत केवळ ४ धावाच करु शकला
 • डिकॉक पाठोपाठ चांगली फलंदाजी करणार रासी वॅन डॅर ड्यूसेनही तंबुत परताला. त्याने ५९ धावात ५२ धावांची खेळी केली. दीपक चहर याने त्याची विकेट घेतली. बदली खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्याकडे झेल देऊन ड्यूसेन बाद झाला.
 • भारताला त्रासदायक ठरु पाहणारा क़्विंटन डिकॉक १२४ धावांवर बाद झाला. भारताला त्रासदायक ठरु पाहणारा क़्विंटन डिकॉक १२४ धावांवर बाद झाला. बुमराहने त्याला शिखर धवनकडे झेल द्यायला लावून बाद केले.
 • क्विंटन डिकॉकच्या शतकापाठोपाठ रासी वॅनडॅर ड्‍यूसेन याने झळकावले अर्धशतक. त्याने ५३ चेंडूत ५० धावा केल्या अआहेत. याखेळीत त्याने ४ चौकारांह एक षटकार ठोकला आहे.
 • क्विंटन डीकॉकने केलेल्या दमदार शतकाच्‍या जाेरावर दक्षिण आफ्रिकेने ३१ षटकांमध्‍ये ३ गडी गमावत १७४ धावा केल्‍या आहेत.
 • २० व्या षटकांत बुमराहच्या गोलंदाजीवर चौकार मारून क्विंटन डी कॉकने द,आफ्रिकेच्या शंभर
  धावा पूर्ण केल्या.
 • पहिल्या दोन सामन्यांतील पराभवानंतर व्हाईट वॉशपासून वाचण्यासाठी प्रयत्न करत असलेला भारतीय संघाने तिसर्‍या एकदिवसीय सामन्‍यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. (  India vs South Africa 3rd ODI ). १४ षटकांनंतर द. आफ्रिकेने ३ गडी गमावून ७३ धावा केल्या आहेत. सामन्यातील १३व्या षटकांत दीपर चहरने केलेल्या चेंडूवर मार्करमचा झेल ऋतूराज गायकवाडने घेतला.
 • तिसर्‍या एकदिवसीय सामन्‍यात दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात झाली. चाहरने केला मलानला बाद करत दक्षिण आफ्रिकेला  पहिला धक्का दिला. यानंतर सातव्‍या षटकांत के. एल. राहूलने मारलेल्या थ्रोवर कर्णधार बवुमा रन आऊट झाला. सात षटकानंतर दक्षिण आफ्रिकेने २ गडी गमावत ३७ धावा केल्‍या आहेत.

हेही वाचलं का? 

Back to top button