Kohli vs Dravid : केपटाऊन कसोटीत विराट कोहलीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम! | पुढारी

Kohli vs Dravid : केपटाऊन कसोटीत विराट कोहलीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहली (virat kohli) फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलेला नाही. तो सातत्याने फेल होत आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतही तो फारशी चांगली चमक दाखवू शकलेला नाही. पण असे असले तरी त्याने केपटाऊन कसोटी (SA vs IND 3rd Test) सामन्यात फलंदाजी करताना राहुल द्रविडचा (rahul dravid) विक्रम मोडला आहे. भारतासाठी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर कसोटीत सर्वाधिक धावा करणारा कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे. (Kohli vs Dravid)

कोहलीने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. विराटने (virat kohli) आपल्या डावात 14 धावा पूर्ण करताच द्रविडचा (rahul dravid) विक्रम मोडीत काढला. द्रविडने दक्षिण आफ्रिकेत कसोटी खेळताना एकूण 624 धावा केल्या. त्याचवेळी, आता कोहलीच्या दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत एकूण 625 धावा झाल्या आहेत. भारताकडून दक्षिण आफ्रिकेत कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने कसोटीत 1161 धावा केल्या आहेत. सचिनने 15 कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला. (Kohli vs Dravid)

भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 25 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 1741 धावा केल्या. सेहवाग भारतासाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 15 कसोटी सामन्यांमध्ये 1306 धावा केल्या आहेत. द्रविडने (rahul dravid) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 1252 धावा केल्या आहेत. (Kohli vs Dravid)

केपटाऊन कसोटीबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात भारताने 2 बाद 75 धावा केल्या. भारताचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि मयंक फार काही करू शकले नाहीत. 33 धावसंख्या असताना भारताचे दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. कोहलीची ही 99 वी कसोटी आहे. अशा परिस्थितीत विराट आपला 99 वा कसोटी सामना संस्मरणीय बनवेल आणि मोठी खेळी खेळेल, अशी आशा चाहत्यांना आहे. (Kohli vs Dravid)

तिसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिराजच्या जागी उमेश यादवचा समावेश करण्यात आला आहे, तर हनुमा विहारीच्या जागी कोहली (virat kohli) प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाला आहे. (Kohli vs Dravid)

Back to top button