Washington Sundar : टीम इंडियाला मोठा धक्का, वनडे संघातील ‘सुंदर’ खेळाडूला कोरोनाची लागण | पुढारी

Washington Sundar : टीम इंडियाला मोठा धक्का, वनडे संघातील ‘सुंदर’ खेळाडूला कोरोनाची लागण

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परिणामी, वॉशिंग्टन सुंदर कोविड पॉझिटीव्ह आल्याने द. आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकावे लगण्याची शक्यता आहे. भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना 19 जानेवारीला खेळवला जाणार आहे.

दरम्यान, आजपासून (दि. ११) भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील तिसरी टेस्ट केप टाऊन येथे सुरू झाली आहे. कसोटी मालिकेतेल हा शेवटचा सामना आहे. यानंतर उभय देशांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी टीम इंडियाचा वनडे संघ उद्या, मंगळवारी (दि. १२) रात्री मुंबईहून दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. पण त्याआधीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. (Washington Sundar)

वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. आता त्याच्या जागी कोण कुणाला संधी मिळनार हे बीसीसीआय उद्या जाहीर करू शकते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 19, दुसरा सामना 21 आणि तिसरा सामना 23 जानेवारीला खेळवला जाणार आहे. वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे गेल्या 10 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. 21 मार्च रोजी त्याने शेवटचा सामना खेळला होता. तो नुकताच बरा झाला होता आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडू संघाचा भाग होता. त्याने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली, त्यानंतर त्याची वनडे संघात निवड झाली. पण कोरोनाची लागण झाल्याने त्याला द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Back to top button