

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनू सूद हा त्याच्या आगामी 'फतेह' साठी उच्च ऑक्टेन अॅक्शन साठी तयारी करताना दिसतोय. (Sonu Sood) सोनू सूद सध्या त्याच्या आगामी हाय-ऑक्टेन अॅक्शन चित्रपट फतेहसाठी चोवीस तास काम करत आहे. हा अभिनेता नव्या अवतारात दिसणार आहे आणि त्याने यापूर्वी त्याच्या कोणत्याही चित्रपटात न केलेले काहीतरी उत्तम देणार असल्याचं समजतंय. कॅमेराबाहेरील त्याच्या कठोर परिश्रमाची ही झलक तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी काय करतोय हे पाहायला मिळतं. (Sonu Sood)
सूद त्याच्या भूमिकेसाठी फिट तर राहतो आहे पण या चित्रपटासाठी तो खास तयारी करताना दिसतोय. त्याच्या सोशल मीडियावर ऑन-सेटवरून झलक पाहायला मिळते. चाहते या नव्या कामासाठी उत्सुक आहेत. सोनू सूद सध्या सर्व अॅक्शन सीक्वेन्स शूट करत आहे आणि अलीकडेच सोनू सूद आणि जॅकलीन यांनी अफलातून स्टंट्स केल्याच्या बातम्या आल्या आहेत.