

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनू सूदने हा कायम त्याच्या अभिनयातून सामाजिक कार्यातून सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असताना आता तो त्याचा फतेह या सागमी चित्रपटासाठी सज्ज होताना दिसत आहे. (Sonu Sood) पर्वतांमधून एका रोमांचक साहसी प्रवासाला तो जाऊन आला आणि हा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Sonu Sood)
संबंधित बातम्या –
सोनू सुदने पर्वत-शिखरांमधून बाईि राईड करत व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून FATEH ? असी कॅप्शन दिलीय. या व्हिडिओमध्ये सोनू सूदचा फिटनेसदेखील दिसून येतो. हा व्हिडिओ केवळ निसर्गरम्य राईड नसून सोनू सूदच्या साहसी छंदाचा पुरावा आहे.
सोनू सूदने 'फतेह' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून ही एक व्हिज्युअल ट्रीट आहे. फतेह २०२३ मध्ये रिलीज होणार असून चाहते चित्रपटासाठी उत्सुक आहेत.