

सवाई माधोपूर; पुढारी ऑनलाईन : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे पोहोचल्या आहेत. येथे त्यांनी मुलगा राहुल गांधी यांच्यासोबत रणथंबोर टायगर सफारीचा आनंद लुटला. रणथंबोर नॅशनल पार्कच्या इन्स्टाग्राम पेजवर सोनिया आणि राहुल गांधी सफारीचा आनंद घेतानाचे एक छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. छायाचित्रांमध्ये दोन्ही काँग्रेस नेते ओपन जीपमध्ये बसलेले दिसत आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर मध्ये हे रणथंबोर नॅशनल पार्क आहे. आता राहुल आणि सोनिया गांधी यांचे हे छायाचित्र सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी या पोस्टला लाईक केले आहे. (Sonia Gandhi Birthday)
सोनिया गांधी शुक्रवारी त्यांचा ७६ वा वाढदिवस साजरा करत असून मुलगा राहुल आणि मुलगी प्रियांका गांधी यांच्यासोबत त्या चार दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला पक्षाच्या एका नेत्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, "ही त्यांची वैयक्तिक भेट आहे आणि कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिलेले नाही." तरी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्याचे पक्षप्रमुख गोविंद सिंह दोतासरा हे सोनिया गांधी यांना भेटतील अशी शक्यता आहे. (Sonia Gandhi Birthday)
सध्या राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून जात असलेल्या काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे'चे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. गुरुवारी, पक्षाने जाहीर केले की यात्रा काही दिवसांसाठी ही यात्रा स्थगित करुन ती पुन्हा 10 डिसेंबर पासून सुरू होईल. यावेळी राहुल गांधी बुंदीहून हेलिकॉप्टरने रणथंबोरला पोहोचले. 'भारत जोडो यात्रा' 21 डिसेंबरला हरियाणात प्रवेश करेल. त्याआधी राजस्थानमधील झालावाड, कोटा, बुंदी, सवाई माधोपूर, दौसा आणि अलवर जिल्ह्यांमधून 17 दिवसांत सुमारे 500 किलोमीटरचे अंतर कापले जाईल.
7 सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला सुरूवात झाली होती. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात जाण्यापूर्वी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांतून प्रवास केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही यात्रा फेब्रुवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये संपेल.
अधिक वाचा :