५०० कोटींच्या चित्रपटाचा टीझरचा जलवा, काही तासातच मिळाले इतके व्ह्यूज

Ponniyin Selvan
Ponniyin Selvan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'रोजा', 'बॉम्बे', 'दिल से' सारखे अनेक हिट चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम आता 'पोन्नियन सेल्वन-1' हा दिमाखदार चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित करण्यात आला असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि अप्रतिम व्हीएफएक्सचं मिश्रण पाहायला मिळत आहे. याशिवाय अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लुकनं सर्वांची मने जिंकली आहेत.

दक्षिण भारतावर राज्य करणार्‍या चोळ राजवंशाचे कथानक या चित्रपटात आहे. हा टीझर पाहिल्यावर अनेकांना 'बाहुबली'ची आठवण आली. चित्रपटात ऐश्वर्या राय-बच्चन राणीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट दोन भागात येणार असून त्यापैकी पहिला भाग 30 सप्टेंबरला प्रदर्शित होईल. चित्रपटाचा 1 मिनिट 20 सेकंदांचा टीझर पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. हिंदी टिझर अमिताभ बच्चन, मल्याळी टीझर मोहनलाल, कन्नड टीझर रक्षित शेट्टी, तामिळ टीझर सूर्या आणि तेलगू टीझर महेश बाबू यांनी लाँच केला आहे.काही मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटाचं एकूण बजेट हे ५००कोटी रुपये एवढं असून हा चित्रपट ३० सप्टेंबर २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पोन्नियन सेल्वन-1 या चित्रपटाचा टीझर आणि सेटची भव्यता पाहून लोकांनी या चित्रपटाच्या टीझर बद्दल खुप कौतुक केले आहे. हा टिझर पाहून अनेकांना 'बाहुबली'चा रेकॉर्ड मोडेल असे अनेकांना वाटत आहे. चित्रपटाचा टीझर समोर येताच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर टीझरने धुमाकूळ घातला आहे. फक्त हिंदीत टीझरबद्दल बोलायचे झाले तर तो १४ तासात १६ लाख वेळा पाहिला गेला आहे. १ मिनिट २० सेकंदाच्या या टीझरने हे सिद्ध केले आहे की पुन्हा एकदा असा चित्रपट येणार आहे, जो भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडवणार आहे. पहा हा टीझर…

ऐश्वर्याची राजेशाही लूक

हिंदी प्रदेशात या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे बॉलिवूडची दमदार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. दीर्घ काळानंतर ऐश्वर्या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लुकनं सर्वांची मनं जिंकली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news