नोरा फतेही प्रेग्नंट?

नोरा फतेही प्रेग्नंट?
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : हल्ली प्रेग्नन्सीबाबतही भलत्यासलत्या अफवा उठत असतात. एखाद्या विशिष्ट पोशाखावरूनही असा भलताच अंदाज बांधणारे सुपीक डोक्याचे अनेक लोक आहेत. त्याचा अर्थातच अभिनेत्रींना त्रास होत असतो.

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. कधी हॉट आणि ग्लॅमरस फोटो, तर कधी जबरदस्त डान्समुळे नोरा फकेही सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आता ज्या कारणांमुळे नोरा फतेही चर्चेत आली आहे, ते चाहत्यांना चकीत करणारं आहे.

गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेही गर्भवती असल्याची अशीच एक भन्नाट अफवा पसरली होती. आता नोराने अनोख्या प्रकाराने या अफवेचे खंडन केले आहे. तिने सोशल मीडियात 'डान्स दिवाने ज्युनिअर्स'च्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये नोरा हा व्हिडीओ शूट करीत असताना तिच्या मागे मर्जी आणि नीतू कपूर येतात.

मर्जी म्हणतो, 'आम्ही प्रेग्नन्सीमध्ये होणार्‍या त्रासाबाबत बोलत आहोत तर इथे नोरा स्वतःकडे पाहण्यात गुंग आहे!' यावर नोरा म्हणते, 'कारण मी प्रेग्नंट नाही!' यावर मर्जी बोलतो 'संपूर्ण जगाला ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!'

सध्या नोराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. डान्स दीवाने' ज्युनियर लवकरच फिनालेमध्ये पोहोचणार आहे, ज्याची शोभा वाढवण्यासाठी रणबीर कपूर आणि वाणी कपूर शोमध्ये हजेरी लावू शकतात. . नोरा सध्या डान्स दिवाने ज्युनियर हा रिअॅलिटी शो जज करते आहे. शोमध्ये तिच्यासोबत नीतू कपूर आणि कोरिओग्राफर मर्झी दिसत आहेत. नीतू कपूरचा हा पहिला रिअ‍ॅलिटी शो आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news