हाच फरक आहे

हाच फरक आहे

अभिनेत्री सोनम कपूर ही अनेकवेळा चर्चेत असते. नुकताच एका जुन्या व्हिडीओमुळे ती पुन्हा ट्रोल झाली आहे. या व्हिडीओत सोनम अभिनेता राजकुमार रावबरोबर नेपोटिझम आणि बाहेरून येणार्‍या कलाकारांबाबत भाष्य करत आहे. सोनमने या मुलाखतीत नेपोटिझम हे कसे योग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. सोनम म्हणाली, मला जेव्हा या क्षेत्रात यायचे होते, त्यावेळी मला संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर सहायक म्हणून काम करायचे होते. मी माझ्या वडिलांना ही गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी तू आदित्य चोप्रा किंवा विधू विनोद चोप्राबरोबर काम कर. त्यांना मी ओळखतो, भन्साळींना मी ओळखत नाही, असे सांगितले. त्यामुळे माझ्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण होते. सोनमचे बोलणे मध्येच थांबून राजकुमार म्हणाला, हाच फरक आहे, तुला कोणाबरोबर काम करायचे आहे यासाठी तुझ्याकडे पर्याय होते. पण सामान्य घरातून येणार्‍या व्यक्तीला येथे काम मिळण्यापासून धडपड करावी लागते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकर्‍यांनी यावर कॉमेंट करत सोनमला ट्रोल केले आहे तर राजकुमार रावची पाठ थोपटली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news