पुढारी ऑनलाईन डेस्क : सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत कुटुंबातल्या कुटुंबात एकमेकांविरोधात उभी राहणारी माणसं पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनचं शालिनी ही गौरीच्या (गिरीजा प्रभू) विरोधात असते. लग्न होऊन गौरी घरात आल्यानंतरदेखील तिचा विरोध मावळलेला नसतो. उलट तो अधिक तीव्र झाला आहे. या मालिकेत या खलनायिकेची भूमिका माधवी निमकर या अभिनेत्रीने साकारली आहे. तिचं शालिनी हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.
ती या मालिकेत उत्कृष्ट खलनायिकेची भूमिका साकारतेय. माधवी निमकरने अनेक चित्रपटात काम केले आहे. मराठीबरोबरच हिंदी मालिकांमध्येही तिचा उत्तम अभिनय आहे. तिचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे.
माधवीने मध्यंतरी एक सुंदर फोटो पोस्ट केला होता. त्यात तिने धोती, शर्ट आणि मोजडी असा हटके लूक केला होता. माधवी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
माधवीने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. यातही तिने 'अवघाची संसार', 'जावई विकत घेणे', 'स्वप्नांच्या पलीकडे' या मालिकांमध्ये काम केलं.
'बायकोच्या नकळत' (२००९) या चित्रपटातून माधवीने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर असा मी तसा मी या चित्रपटात ती झळकली.
'संघर्ष', 'नवरा माझा भवरा', 'सगळं करून भागलं', 'धावाधाव', 'बायकोच्या नकळत' या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
माधवीने तिचे काही जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
माधवीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या जुन्या मैत्रिणी देखील दिसतात.
ती आणि तिच्या मैत्रीणींनी हा फोटो स्टुडिओमध्ये जाऊन काढलेला होता. पण, या फोटोमध्ये तिला ओळखणंदेखील कठीण होऊन जातं.
हा फोटो शेअर करताना माधवीने लिहिलं होतं, ' काळ मागे पडतो… परंतु आठवणी कायमस्वरुपी राहतात… सगळ्यांना खूप मिस करत आहे…'
माधवी सेटवरचे तसेच तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअऱ करत असते. या व्हिडिओत माधवी योगा करताना दिसतेय. पण, हा योगा करण्यास खूपच कठीण आहे. ती चाहत्यांना योगाचे धडेदेखील देते.