सलमान खानने शेअर केला अक्षय रडतानाचा व्हिडीओ

सलमान खानने शेअर केला अक्षय रडतानाचा व्हिडीओ

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडचा अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून 'हेराफेरी ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षयने 'हेराफेरी ३' ला नकार दिल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. नुकतेच भाईजान सलमान खान याने अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अक्षय रडताना दिसत आहे.

हा व्हिडीओ पाहून अक्षयचे चाहतेदेखील भावुक झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अक्षयला रडताना पाहून सलमानदेखील अत्यंत भावुक झाला आहे. अक्षयची बहीण अलका भाटिया हिने त्याला रिअॅलिटी शोमध्ये एक ऑडिओ क्लिप पाठवली. त्यानंतर अक्षय भावुक होतो आणि रडायला लागतो. सलमानने शेअर केलेल्या या व्हिडीओवर आता अक्षयनेही देखील उत्तर दिले आहे. 'आपके संदेश से बहुत अच्छा लगा', असे अक्षयने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news