समंथाची भटकंती

समंथाची भटकंती

पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री समंथा गतवर्षी 'फॅमिली मॅन 2' ही वेबसीरिज आणि नागा चैतन्यसोबतचा तिचा घटस्फोट यामुळे चर्चेत होती. घटस्फोट झाल्यापासून समंथाने स्वतःला कामात गुंतवून घेतले आहे. 'पुष्पा'तील तिच्या आयटम साँगचीही बरीच चर्चा झाली. त्यानंतर तिची फॅन फॉलोविंगही वाढली. दरम्यान, कामातून ब्रेक मिळाल्यानंतर समंथा कुठे ना कुठे फिरायला जात असते. त्याचे फोटोही ती शेअर करत असते. आताही समंथाने तिच्या केरळ टूरचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत.

कामातून मुक्‍त होऊन स्वतःसाठी वेळ देणे म्हणजेच आयुष्य आहे, असे समंथा म्हणते. समंथाला 'पुष्पा'तील आयटम साँगनंतर अनेक बड्या ऑफर्सही मिळाल्या आहेत. आगामी काळात ती फिलिप जॉनच्या 'अरेंजमेंटस् ऑफ लव्ह' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती समलिंगी गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय समंथा बॉलीवूडमध्येही पदार्पण करण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news