सना खान होणार लवकरच आई

सना खान होणार लवकरच आई
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री सना खान आई होण्यासाठी उत्सुक आहे. सनाने अलीकडेच ही गोड बातमी दिली आहे. सनाने 'जय हो', 'वजह तुम हो', 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'सिलबट्टम' आणि 'मिस्टर नुक्या' यांसारख्या हिंदी, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. सना खानने २०२१ मध्ये फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला. फेब्रुवारी महिन्यात तिने सोशल मीडियावर लिहिले होते की, मी लवकरच एक खास बातमी शेअर करणार आहे. सना खान आणि तिचा नवरा अनस सईद यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, जून महिन्यात बाळाचा जन्म होणार आहे.

मुलाखतीदरम्यान आई होण्याची भावना कशी आहे, असे विचारल्यावर सना म्हणाली की, मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे. आयुष्यातील या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. माझ्या चिमुकल्या बाळाला माझ्या मिठीत घेण्याची वाट पाहात आहे. यावेळी सनाने जुळी बाळं येणार नसल्याचे स्पष्ट केले. पण, भविष्यात दुसऱ्या बाळाचा विचार नक्की करणार असल्याचे ती म्हणाली. मुलाखतीच्या क्लिपवर चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे. दोन वर्षांपूर्वी सिनेसृष्टीला अलविदा करताना सना म्हणाली होती, आज मी आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news