![सख्ख्या भावांना डेट करीत होत्या सारा, जान्हवी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2F%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी अनुक्रमे 'केदारनाथ' आणि 'धडक'मधून एकाच वेळी पदार्पण केले होते. त्यामुळे दोघींमध्ये (श्रीदेवी आणि जयाप्रदासारखी) स्पर्धा असेल असे कुणालाही वाटू शकते.
वास्तवात मात्र तसे नसून दोघी एकमेकींच्या 'जीवश्च कंठश्च' अशा मैत्रिणी आहेत. दोघी अनेक वेळा एकत्रच सुट्टी घालवण्यासाठीही जात असतात. आता करण जोहरने त्याच्या शोमध्ये दोघींबाबत एक खुलासाही केला आहे. त्याने शोमध्ये म्हटले, आता तुमच्या दोघींची मैत्री कितपत आहे याची मला कल्पना नाही; पण कोव्हिड काळाच्या आधी तुम्ही दोघींनी दोन सख्ख्या भावांना डेट केले आहे.
ते दोन्ही भाऊ माझ्याच इमारतीत राहत होते. या दोन भावांमुळेच आपल्या तिघांमध्ये मैत्री वाढली आहे. करणने उल्लेख केलेले हे दोन भाऊ एका उद्योजक कुटुंबातील असून दोघे एका राजकीय नेत्याचे नातूही आहेत.