मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'ससुराल सिमर का २' फेम अभिनेता शोएब इब्राहिम आणि अभिनेत्री दीपिका कक्कड आजकाल बरेच संकटाचा सामना करत आहेत. शोएब इब्राहिम यांच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले आहे.
शोएब आणि दीपिका दोघांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
अधिक वाचा
शोएब आणि दीपिकाने आपआपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात दोघांनी वडिलांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचे सांगितले आहे. तसेच प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना आयसीयूत दाखल केल्याचे म्हटले आहे. यासोबत दोघांनी वडिलांच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करण्याची विनंती देखील चाहत्यांना केली आहे.
अधिक वाचा
यात 'आपणा सर्वांना पुन्हा एकदा आमच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. माझ्या वडिलांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. सध्या ते आयसीयूमध्ये आहेत. कृपया आपणा सर्वांना विनंती आहे की, देवाकडे ते लवकरात- लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी.' असे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
शोएब इब्राहिमचे वडील गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. फेब्रुवारी महिन्यातही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. या दरम्यान शोएब आणि दीपिका दोघेही त्यांची काळजी घेत होते. परंतु, त्यांना अचानक ब्रेन स्ट्रोकचा झटका आला.
अधिक वाचा
याआधी शोएबने आपल्या आई- वडिलांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करताना त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. शोएबने या फोटोच्या कॅप्शनमध्ये 'अल्लाह तुम्हा दोघांनाही नेहमी आनंदीत ठेवो, सुरक्षित ठेवो.' असे लिहिले होते.
हेही वाचलंत का?
पाहा : बाप्पांच्या आगमनाची लगबग सुरु…