शमिता शेट्टी होती डिप्रेशनने त्रस्त

शमिता शेट्टी
शमिता शेट्टी
Published on
Updated on

नवी दिल्ली :

'बिग बॉस 15' फेम शमिता शेट्टीने आपली बहीण शिल्पा शेट्टीचा 'चॅट शो शेप ऑफ यू'मध्ये आपल्या खासगी जीवनाचे अनेक पैलू उघडले. चर्चेदरम्यान शमिताने इनसेक्युरिटी व डिप्रेेशनच्या दिलेल्या लढ्याबद्दल सांगितले.
भलेही मी आता शांत दिसत असले तरी एकवेळ अशी होती की, मी अतिसावध असायची. यामुळे मी स्लिव्हलेस टॉपसुद्धा वापरायची नाही. अशाप्रकारे मी नैराश्याच्या गर्तेत अडकले होते. मात्र, जीवनात नव्या आव्हानांना सामोरे जावेच लागते, असा सकारात्मक विचार करून मी आणखी भक्‍कम आणि सक्षम होऊन नैराश्यातून बाहेर पडले. त्यानंतर मला 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री मिळाली. एकवेळ मी डिप्रेशनमध्ये होते. मात्र, जीवनाचा हा खडतर टप्पा पार केला असला तरी मी सातत्याने माझ्या मानसिक आरोग्याची चाचपणी करत असते. जेणेकरून पुन्हा डिप्रेशनमध्ये जाणार नाही, असेही शमिताने यावेळी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news