पुढारी ऑनलाईन
एपिक फँटसी अॅडव्हेंचर चित्रपट फ्रँचायजी 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज'चे जगभरात चाहते आहेत. आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या चित्रपट फ्रँचायजीचा प्रीक्वेल वेबसीरिजच्या रूपात घेऊन येत आहे. त्याचा पहिला टीझर सोमवारी रीलिज झाला आहे. यात 'द रिंग्ज ऑफ पॉवर'ची कहाणी आणि कॅरेक्टर्सची झलक दाखवली आहे.
भारतात ही सीरिज 2 सप्टेंबर रोजी इंग्रजीसह हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रीलिज होईल. या एका मिनिटाच्या टीझरमध्ये सीरिजच्या भव्यतेचा अंदाज येतो.
'द रिंग्स ऑफ पॉवर' अॅमेझॉन प्राईमची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि महागडी सीरिज असणार आहे. दरम्यान, 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज'ची कहाणी मिडल अर्थ या काल्पनिक ठिकाणी घडते. तीन चित्रपटांनंतर प्रीक्वेल फिल्म सीरिज 'द हॉबिट'नावाने तीन भागांत प्रदर्शित झाले आहेत.