रश्मिका मंदाना : ‘डियर कॉम्रेड्स’चे यंदा कर्तव्य आहे?

रश्मिका मंदाना : ‘डियर कॉम्रेड्स’चे यंदा कर्तव्य आहे?

पुढारी ऑनलाईन

गेल्या काही काळात अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या अफेयरच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होत्या. अलीकडच्या काळात दोघांनी गोव्यात एकत्र ख्रिसमस साजरा केला होता तर मुंबईतही दोघे एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना दिसले होते. त्यामुळे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण, कुणाकडून त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले नव्हते. तथापि, आता थेट हे दोघे लग्‍न करणार असल्याच्या चर्चा इंडस्ट्रीत सुरू झाल्या आहेत.

याच वर्षी दोघे लग्‍न करणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. अर्थातच यावर दोघांकडूनही अधिकृत वक्‍तव्य समोर आलेले नाही. रश्मिका आणि विजय जोडीने यापूर्वी तेलगू इंडस्ट्रीत 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या चित्रपटांत एकत्रित काम केले आहे. या दोघांची जोडी प्रसिद्ध असून यशस्वीही ठरली आहे. या दोन चित्रपटांनंतरपासून दोघांच्या अफेयर आणि डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

रश्मिका लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर विजय देखील अनन्या पांडेसोबतच्या 'लायगर ः क्रॉसब्रीड साला'मधून बॉलीवूडमध्ये येत आहे. त्यामुळे हल्ली दोघेही मुंबईतच राहतात. विजय सध्या 'लायगर'च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तर रश्मिका 'मिशन मजनू'च्या चित्रीकरणात बिझी आहे. त्यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांच्या 'गूड बाय'मध्येही ती दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news