रणबीर-आलियाला कोट्यवधींच्या मिळाल्या भेटवस्तू

ranbir and alia
ranbir and alia

पुढारी ऑनलाईन

हल्‍ली अनेक लोक लग्‍नपत्रिकेतच 'आपली उपस्थिती हाच आहेर' असे लिहून भेटवस्तू देण्या-घेण्याचे टाळत असतात. हे अर्थातच चांगले असले तरी अनेक प्रियजन प्रेमाने काही ना काही भेटवस्तू देतच असतात. आलिया आणि रणबीर कपूर यांनाही आपल्या लग्‍नात अनेकांकडून अत्यंत महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. रणबीरची आई नितू कपूर यांनी या दाम्पत्यास 26 कोटींचा 6 बीएचके फ्लॅट भेट म्हणून दिला आहे. रणबीरची एक्स-गर्लफे्रंड कॅटरिना कैफ ही आलियाची चांगली मैत्रीण आहे. तिने आलियाला 14.5 लाख रुपयांचे प्लॅटिनम ब—ेसलेट दिले आहे.

रणबीरची आणखी एक एक्स-गर्लफ्रेंड दीपिका पदुकोनही आलियाची मैत्रीण आहे. तिने आलियाला 15 लाख रुपयांचा घड्याळाचा सेट दिला आहे. आलियाचा एक्स-बॉयफे्रंड व चित्रपटातील पजहिला हीरो सिद्धार्थ मल्होत्रा याने आलियाला तीन लाख रुपयांची हँडबॅग दिली आहे. वरुण धवननेही 'बेस्ट फे्रंड' आलियाला 4 लाख रुपयांची हाय हिल सँडल दिली आहे. प्रियांका चोप्राने आलियाला 9 लाख रुपयांचा हिर्‍यांचा नेकलेस दिला आहे. अर्जुन कपूरने मित्र रणबीरला दीड लाख रुपयांचे जॅकेट दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news