…म्हणून सुझानवर चाहते भडकले

…म्हणून सुझानवर चाहते भडकले
Published on
Updated on

अभिनेता हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान अनेकदा चर्चेत असते. हृतिकशी घटस्फोट घेतल्यानंतर सुझान सध्या अर्सलान गोनी याच्याबरोबर रिलेशनमध्ये आहे. या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर खूप चर्चा असते. अलीकडेच या दोघांनी मिळून व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यावेळचे काही फोटो आणि व्हिडीओ सुझानने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. आता याच व्हिडीओ आणि फोटोंमुळे सुझानला नेटकर्‍यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकर्‍याने विचारले की, हा माणूस हृतिकपेक्षा चांगला कसा असू शकतो? हृतिक सर्वात देखणा आहे. आणखी एका यूझरने लिहिले की, 'मला तुमच्या मुलांबद्दल खूप वाईट वाटत आहे. तुम्ही दोघेही स्वार्थी होऊन आपापले आयुष्य नवीन जोडीदारांबरोबर घालवणार आहात. मात्र, यातून तुम्ही तुमच्या मुलांना कसला संदेश देताय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news