मानुषी इन अ‍ॅक्शन मोड

मानुषी इन अ‍ॅक्शन मोड

पुढारी ऑनलाईन डेस्क : अक्षयकुमारसोबत 'पृथ्वीराज'या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केलेली माजी मिस वर्ल्ड अभिनेत्री मानुषी छिल्लर आता अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपटात दे मार अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. मानुषीचा हा चित्रपट माचो अभिनेता जॉन अब्राहमसोबत असणार आहे. या चित्रपटाची तयारीही मानुषीने सुरू केली आहे. या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'तेहरान'. जॉन आणि मानुषी यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणास प्रारंभ केला आहे.

अरुण गोपालन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील जॉन आणि मानुषीचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. विकी कौशलसोबत ती 'द ग्रेट इंडियन फॅमिली'या चित्रपटातही काम करत आहे. याशिवाय यशराज फिल्म्सच्या एका आगामी नाव न ठरलेल्या चित्रपटात ती अजय देवगणसोबत दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news