‘भूलभुलय्या-2’ला बंपर ओपनिंग!

‘भूलभुलय्या-2’ला बंपर ओपनिंग!

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'भूलभुलय्या-2'ला इतकी तगडी ओपनिंग मिळाली आहे जी गेल्या पाच महिन्यांमध्ये कोणत्याही चित्रपटाला मिळालेली नव्हती. त्यामुळे विशेषतः कार्तिक आर्यन खुश आहेच; पण बॉलीवूडमध्येही आनंदाचे वातावरण आहे. यावर्षीची आतापर्यंतची सर्वाधिक ओपनिंग अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'ला मिळालेली होती. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 13.25 कोटी रुपये कमावले होते. आता हा विक्रम 'भूलभुलय्या-2'ने मोडला आहे. या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई सुमारे 14.75 कोटी रुपये आहे. हा चित्रपट देशभर समारे 3200 स्क्रीन्सवर झळकला आहे. चित्रपटात कार्तिकसमवेत कियारा अडवाणी, तब्बू, राजपाल यादव आदींच्या प्रमुख भूमिका आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news