पुढारी ऑनलाईन
अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिच्या आगामी 'बबली बाऊन्सर' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. तमन्नाने चित्रपटाच्या सेटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात तिच्यासोबत दिग्दर्शक मधुर भांडारकरही दिसतात. मोहालीत या चित्रपटाचे शूटिंग होत आहे. चित्रपटाची कहाणी एका महिला बाऊन्सरच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात सौरभ शुक्ला, अभिषेक बजाज, साहिल वैद यांच्याही भूमिका आहेत. या वर्षीच्या अखेरपर्यंत हिंदीसह तमिळ आणि तेलगू भाषेत हा चित्रपट रीलिज करण्याचे नियोजन आहे.