प्रियांका की नागीण?

प्रियांका की नागीण?

आपल्याकडे नागिणीच्या विषयावर ढीगभर चित्रपट आणि मालिका येऊन गेलेल्या आहेत. अशा नायिकांना बर्‍याच वेळा सर्परूपातील दागदागिने घातलेले असतात. आता प्रियांका चोप्रानेही असाच अवतार करून फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना ही प्रियांका आहे की नागीण असा प्रश्न पडला.

ब्लॅक कलरच्या बॉडीकॉन ड्रेसमधील प्रियांकाने गळ्यात, हातात व बोटात सापाच्या रूपातील दागिने परिधान केले होते. तिचा हा लूक चाहत्यांना पसंत आला. सध्या तिचे अनेक हॉलीवूडपट व वेबसीरिजही प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. ती आता खर्‍या अर्थाने 'ग्लोबल आयकॉन' बनलेली आहे!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news