प्राजक्ताला महाराष्ट्राचा अभिमान!

prajkta mali
prajkta mali

पुढारी आॅनलाईन : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. काही दिवस ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या कार्यक्रमाच्या शूटिंगमधून थोडी विश्रांती घेऊन लंडनला गेली आहे. प्राजक्ता आणि पर्यटनाचे जवळचे नाते असून नुकतीच 'जागतिक पर्यटन दिनानिमित्त' तिने एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधून तिचे महाराष्ट्रावर किती प्रेम आहे हे दिसून येते. प्राजक्ताने भारताबरोबरच अनेक विदेश दौरेही केले आहेत. ती आतापर्यंत सुमारे 14 देशांमध्ये फिरली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत परदेशातील नव्हे तर महाराष्ट्रातील तिने भेटी दिलेल्या ठिकाणांचे फोटो शेअर केले आहेत. देशभरातल्या विविध ठिकाणांचा व्हिडीओ पोस्ट केल्यावर लक्षात आले की, महाराष्ट्रातल्या ठिकाणांचाही व्हिडीओ करायला हवा, त्याचा प्रवास तर फारच जवळचा आहे. मी केवळ मराठी आहे म्हणून नाही तर महाराष्ट्र आहेच लय भारी, असे प्राजक्ताने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news