पूनम पांडे : ‘तो’ वाद सुरू असेपर्यंत लोक तुमची चर्चा करतात

पूनम पांडे
पूनम पांडे
Published on
Updated on

सिनेसृष्टीत बोल्डनेसमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून पूनम पांडेकडे पाहिले जाते. ती तिच्या कामापेक्षा विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण आता पूनमने एक मोठा निर्णय घेतला आहे. नुकतेच एका मुलाखतीत पूनम म्हणाली, मी आता वादग्रस्त गोष्टींपासून दूर राहून कामावर लक्ष केंद्रित करणार आहे, मला असे वाटते की, एखाद्या वादग्रस्त गोष्टींमुळे तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी ही केवळ 15 मिनिटांसाठी असते. त्यापेक्षा जास्त नाही. तो वाद सुरू असेपर्यंत लोक तुमची चर्चा करतात. त्यानंतर ते तुम्हाला विसरलेले असतात, पण त्या उलट तुम्हाला तुमच्या कामामुळे मिळालेली ओळख दीर्घकाळ टिकते. मी बर्‍याचदा काहीही बोलते, पण आता मला असे वाटते की कधी कधी गप्प बसणे देखील चांगले असते. मी आता गोष्टींचे मॅनेजमेंट करणे शिकली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news