पाॅर्नोग्राफी आणि राज कुंद्रा : 'त्या' बंगल्यावर नेमकं काय घडलं?
पाॅर्नोग्राफी आणि राज कुंद्रा : 'त्या' बंगल्यावर नेमकं काय घडलं?

पाॅर्नोग्राफी आणि राज कुंद्रा : ‘त्या’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाॅर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला म्हणजेच राज कुंद्राला मागील आठवड्यात मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. खरंतर मुंबई पोलिसांना राज कुंद्राच्या या धंद्याबद्दल टीप मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाई सुरू केली. समुद्रकिनारी असणाऱ्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांच्या माहितीनुसार बंगल्यावर छापा टाकण्यात आला तेव्हा आतमध्ये पलंगावर दोन व्यक्ती आक्षेपार्ह स्थितीत होते. त्यांचा व्हिडीओ शूट एका महिलेने केलेला होता. यापूर्वी पोलिसांना या प्रकरणाची माहिती होती. मात्र, ठोस पुरावा पोलिसांकडे नव्हता. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी थेट बंगल्यावर छापा टाकला. मुख्य संशयितांना ताब्यात घेतले. याच पुराव्यावरून प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला म्हणजेच राज कुंद्राला पाॅर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनी अटक केली.

पाॅर्नोग्राफीच्या प्रकारणात नेमंक काय तथ्य? 

पोलिसांच्या सांगतात, "तपासात समोर आलेल्या महिलेने असा आरोप केला आहे की, या लोकांनी भविष्यामध्ये शाॅर्टफिल्म आणि वेबसीरिजमध्ये प्रमुख्य भूमिका देण्याचे आश्वासन देऊन मला पाॅर्नोग्राफीमध्ये काम करण्यास भाग पाडले होते. इतकंच नाहीतर, अटक करण्यात आलेल्या एकाने 'हाॅटहीट' या मोबाईल अ‍ॅपचाही उल्लेख केलेला होता."

संबंधित महिलेने पोलिसांना अशीही माहिती दिली की, "हाॅटहीट हे अ‍ॅप ओटीटी प्लॅटफाॅर्मप्रमाणेच काम करत होते. ज्यामध्ये ग्राहक महिन्याला २००-४०० रुपये देऊन त्याचे अ‍ॅक्सेस मिळत होते. त्यानंतर अपलोड केलेले पाॅर्नोग्राफी काॅन्टेट ग्राहकाला नियमतपणे पहायला मिळत असे."

पोलिसांनी असंही सांगितलं की, "अडल्ट मुव्हीचे शुटींग करत असताना वेगवेगळे लोकेशन सिलेक्ट केले जात असते. तेथील बंगला भाड्याने घेतला जायचा. या मुव्हिजमध्ये मुख्य काम करण्यासाठी संघर्ष करणारे कलाकार (स्ट्रग्लर्स) निवडले जायचे. ज्यावेळी छापा मारला गेला, त्यावेळी तो बंगलादेखील असाच भाड्याने घेतलेला होता", अशीही माहिती पोलिसांकडून समोर आलेली आहे.

राज कुंद्रा पाॅर्नोग्राफी रॅकेटशी कसा कनेक्टेड आहे?

पोलिस तपासामध्ये असं आढळलं की, राज कुंद्रा हा हाॅटहीट आणि तशाच प्रकारच्या आणखी ३ अ‍ॅप्सचे नेतृत्व करत होता. पोलिसांचे म्हणण्यानुसार राज कुंद्राने यापूर्वीही भारतीय कायद्यांना बगल देऊन 'हाॅटशाॅट' नावाचे आणखी एक अ‍ॅप ब्रिटनमध्ये असणाऱ्या केनरिन लिमिटेड नावाच्या कंपनीला विकले होते. या अ‍ॅपची मालकी राज कुंद्राच्या मेव्हण्याकडे होते.

आजदेखील भारतात असणारी वियान इंडस्ट्रीज ही केनरीन कंपनीकडून हाताळली जाते. हात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला. त्यातून वियान इंडस्ट्रीजवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पाॅर्नोग्राफीसंबंधी साहित्य पोलिसांच्या हाती लागले. तसेच व्हाॅट्सअप आणि ईमेल्समधील संवाद सापडला. त्यातून राज कुंद्राचा थेट पाॅर्नोग्राफी रॅकेटशी संबंध असल्याचा पुरावा मिळाला. भारतातील कायद्यांचा विचार केला, तर पाॅर्नोग्राफी किंवा सेक्स व्हिडिओ पाहणे बेकायदेशीर नाही. तर अडल्ट फिल्म्स तयार करणे आणि त्याचे वितरण करणे बेकायदेशीर आहे, याच एका मुद्दावर राज कुंद्रा पोलिसांनी अटक केली.

राज कुंद्राच्या वकिलाचं मत काय?

पाॅर्नोग्राफी रॅकेट प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे. त्यात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रादेखील आहे. राज कुंद्राचे वकील त्याच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयात प्रयत्न करत आहेत. कुंद्राचे वकील असं म्हणतात की, " पोलिसांनी पोलिसांनी राज कुंद्रा यांना केलेली अटक ही बेकायदेशीर आहे. राज कुंद्रा यांच्या ऑफिस किंवा घरामध्ये सापडेल्या वस्तूंमध्ये असा कोणताही व्हिडीओ पोलिसांना सापडलेला नाही, ज्याला पाॅर्नोग्राफी किंवा अश्लीलता म्हंटले जाऊ शकते", असं मत राज कुंद्राच्या वकिलांनी मांडलं आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news