पुढारी ऑनलाईन
प्रियांका चोप्राने नुकताच सोशल मीडियात आपल्या नव्या गाडीचा फोटो शेअर केला आहे. ही 'ऑल टेरेन व्हेईकल' तिला तिचा पती निक जोनासने भेट म्हणून दिली आहे. या स्टील ग्रे कलरच्या एटीव्ही कारच्या एका बाजूस 'मिसेस जोनास' असे लिहिलेले आहे. प्रियांकाने ही नवी एटीव्ही चालवत असतानाचा फोटो शेअर केला आहे आणि तिने लिहिले आहे की 'याला म्हणतात राईड! मला कायम मदत केल्याबद्दल थँक्यू निक जोनास. बेस्ट हजबंड एव्हर!' नुकतेच हे प्रेमळ जोडपं आई-बाबाही बनलेलं आहे. दोघांना एक कन्यारत्न असून तिचे नाव मालती मेरी असे आहे.