नागा-शोभिता यांच्यात कुछ कुछ हो रहा हैं!

naga chaitanya
naga chaitanya

अभिनेत्री समंथाचा पूर्वाश्रमीचा पती आणि अभिनेता नागा चैतन्य सध्या त्याच्या बॉलीवूड पदार्पणासाठी उत्सुक आहे. आमिर खानच्या 'लाल सिंग चढ्ढा'मध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनवेळी एका इव्हेंटमध्ये नागा याला त्याच्या कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री शोभिता धुलिपालाविषयी प्रश्‍न विचारला. त्यावर नागाने केवळ स्मित केले. या प्रश्‍नामुळे त्याचा चेहरा ब्लश झाला होता. स्वतःला सावरत लगेच नागा म्हणाला की, प्रश्‍नच इतका चांगला आहे की, त्यामुळे चेहर्‍यावर हसू आले.

समंथाशी घटस्फोट घेतल्यापासून नागाचे नाव शोभिताशी जोडले जात आहे. या मुलाखतीत एकप्रकारे शोभिताशी डेटिंग करत असल्याच्या बातम्यांना नागाने दुजोराच दिला आहे. अर्थात, शोभिता किंवा नागा यापैकी कुणीही यावर अधिकृतरीत्या काहीही सांगितलेले नाही. नागा चैतन्यनने हैदराबादमध्ये एक नवे घर खरेदी केले आहे. त्या घराचे काम अद्याप सुरू असले, तरी नागा आणि शोभिता या घरात दिसले होते. याशिवाय ज्या हॉटेलमध्ये शोभिता तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थांबली होती त्याच हॉटेलमध्ये नागा चैतन्य दिसून आला होता. काही दिवसांपूर्वीच शोभिताने तिचा वाढदिवसही हैदराबादमध्येच सेलिब्रेट केला होता. वारंवार ही जोडी एकत्र दिसत असते. त्यामुळेच दोघे डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. शोभिताच्या हॉटनेसमुळे तिचा एक वेगळाच चाहतावर्ग तयार झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news