‘देसी गर्ल’चा नवा व्यवसाय

‘देसी गर्ल’चा नवा व्यवसाय
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाच्या निमित्ताने चर्चा सुरूच असते. मात्र, यावेळी चर्चेत राहण्याचे कारण जरा वेगळेच आहे. प्रियांकाने नुकताच एक नवा व्यवसाय सुरू केला आहे. रेस्टॉरंटनंतर तिने 'होमवेयर ब्रँड' लाँच केला आहे. मात्र, तेथील वस्तूंची किंमत ऐकून प्रत्येकजण आश्‍चर्यचकित होत आहेत.

प्रियांकाच्या नव्या कंपनीचे नाव 'सोना होम' असे आहे. मात्र, यामध्ये विकल्या जाणार्‍या वस्तूंचे भाव फारच जास्त आहेत. या 'होमवेयर ब्रँड'मध्ये विकल्या जाणार्‍या एका कपची किंमत पाच हजार रुपये आहे, तर एका प्लेटची किंमत तब्बल सहा हजार रुपये आहे. प्रियांकाच्या या 'होमवेयर ब्रँड'मध्ये टेबल कव्हरसारखी वस्तू घ्यावयाची असेल तर तब्बल 30 हजार रुपये मोजावे लागतात. देसी गर्लने आपल्या 'होमवेयर ब्रँड'बद्दल सांगितले असले तरी तेथील वस्तूंच्या किमती ऐकून लोक आता प्रियांकालाच ट्रोल करू लागले आहेत. साध्या साध्या वस्तू इतक्या महागड्या का? असा प्रश्‍नही ते करू लागले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news