केजीएफ-2 : तीन दिवसांत 143 कोटींची कमाई

अभिनेता यश
अभिनेता यश
Published on
Updated on

नवी दिल्ली :

यश स्टारर 'केजीएफ-2' या चित्रपटाला जबरदस्त ओपनिंग मिळाले आहे. हिंदी बेल्टमध्ये या चित्रपटाने तिसर्‍या दिवशी 42.90 कोटींची कमाई केली आहे. यामुळे या चित्रपटाची हिंदीतील कमाई 143.64 कोटींवर पोहोचली आहे. हिंदी व्हर्जनमध्ये तीन दिवसांत इतकी कमाई करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. यापूर्वी 'बाहुबली-2'ने 128 कोटींची कमाई केली होती.

'केजीएफ-2'ने सर्व व्हर्जनमध्ये तीन दिवसांत एकूण 400 कोटींची कमाई केली आहे. रविवारी हा चित्रपट 500 कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा विश्‍लेषकांचा अंदाज आहे. या चित्रपटाचे दुसर्‍या दिवसाचे वर्ल्डवाईड कलेक्शन 139.25 कोटी रुपये झाले. चित्रपटात कन्‍नड अभिनेता यश याच्यासोबत संजय दत्त आणि रविना टंडन आहे. खरे तर या चित्रपटाचे बजेट 100 कोटींचे होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news