नवी दिल्ली :
कॅटरिना कैफ व अक्षय कुमार यांचा 15 वर्षांपूर्वी 'नमस्ते लंडन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. चित्रपटातील उत्कृष्ठ अभिनयामुळे कॅटरिनाची कारकीर्द पुन्हा रूळावर आली होती. या चित्रपटापासून कॅटरिना व अक्षय कुमार यांची जोडी चाहत्यांना पसंद पडू लागली.
'नमस्ते लंडन'ला चांगले यश मिळेल, असे कॅटरिनाला वाटले नव्हते. यामुळेच तिने 'नमस्ते लंडन' रीलिज होण्यापूर्वीच बॅग भरून घरी जाण्याचा विचार केला होता. एका कार्यक्रमात बोलताना कॅटरिनाने सांगितले की, हा चित्रपट फ्लॉप होईल. यामुळे तो रीलिज होण्यापूर्वीच बॅग भरून घरी जाण्याचा म्हणजे बॉलीवूड सोडण्याचा विचार केला होता. मात्र, लोकांनी हा चित्रपट क्रिटिकली आणि कमर्शियली पसंद केला. चित्रपटाला यश मिळाल्याने मी अत्यंत आनंदी होते.