कॅटरिना प्रेग्नंट?

Katrina Kaif
Katrina Kaif

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सलमान खानची बहीण अर्पिताने ईदनिमित्त जंगी पार्टीचे आयोजन केले होते. यात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र, या पार्टीत चर्चा रंगली ती कॅटरिना कैफची. कॅटरिनाने अभिनेता विकी कौशलशी लग्न केले. त्यानंतर कॅटरिना प्रेग्नंट असल्याची अनेकदा अफवा उडाली आहे. आता कॅटरिनाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यावरून ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अर्पिताच्या ईद पार्टीत कॅटरिनाही सहभागी झाली होती. यावेळी कॅटरिनाने पांढर्‍या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. यात ती खूपच सुंदर दिसत होती; मात्र सगळ्यांची नजर खिळली ती तिच्या पोटावर. पापाराझींना पाहताच कॅटरिना त्यांना पोझ देण्यासाठी उभी राहिली. पण, पोझ देत असताना ती सतत तिची ओढणी सांभाळताना दिसली आणि तिचा हात सतत तिच्या पोटाच्या समोर घेत होती. कॅटरिनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत ती आपले बेबी बंप ओढणीने लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे सर्वांना वाटत आहे. ती तिची प्रेग्नंसी लपवते आहे, मला असे वाटत आहे, अशी एकाने; तर ती प्रेग्नंट आहे असे वाटते आहे, असे दुसर्‍या एकाने प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news