कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा पॅचअप?

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा पॅचअप?

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा ब्रेकअप  झाल्याची चर्चा होती. मात्र दोघांचा 'पॅचअप' झाल्याचेच दिसून येत आहे. करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघे एकाच गाडीतून आल्याने त्यांचे चाहते खूश झाले. दोघेही एकमेकांच्या सहवासात खूश असल्याचेच दिसून येत होते. या पार्टीत कियाराने परिधान केलेला पोशाखही लोकांचे लक्ष वेधून गेला. पाश्चात्त्य पोशाखात आलेल्या कियाराचा हा लुक सोशल मीडियातही झळकत होता.

सध्या कियारा आणि कार्तिक आर्यनच्या 'भूलभुलय्या-2' ला मोठेच यश मिळत असल्याने कियारा खूश आहे. 'कबीरसिंह', 'शेरशाह'च्या यशानंतर आता कियाराला पुन्हा एकदा यशाची चव चाखण्यास मिळाली आहे. तिचे 'जुग जुग जियो' व 'गोविंदा नाम मेरा' हे चित्रपटही आता प्रदर्शनासाठी सज्ज झाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news