करिना कपूर- कोणतीही सीमारेषा आखत नाही

करिना कपूर- कोणतीही सीमारेषा आखत नाही

बेबो करिना कपूर-खान आणि पती सैफ अली खान हे लोकप्रिय कपल आहे. करिना वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल करिअर याबाबात कायमच स्पष्ट बोलत असते. काही दिवसांपूर्वी करिना आणि सैफ एका पार्टीमधून घरी परतले होते तेव्हा काही पापाराझी त्यांच्या घराबाहेर उभे होते. त्यावेळी सैफ पापाराझींवर भडकला होता. त्यावरच आता करिनाने भाष्य केले आहे. ती म्हणाली, मी कोणतीही सीमारेषा आखत नाही आणि जेव्हा ते आमचे फोटो क्लिक करतात तेव्हा काही हरकत नाही. मला असे कधी कधी वाटते, मी काय करू शकते त्यांच्यासाठी. मी फक्त त्यांना विनंती करते की, इमारतीच्या आवारात आल्यावर किंवा मुले खेळत असताना फोटो काढू नका. पापाराझी व बॉलीवूडचे कलाकार यांच्यात कायमच वाद असतात. काही दिवसांपूर्वी आलिया भट्टचे काही खासगी फोटो व्हायरल करण्यात आले होते. त्यावरून बॉलीवूड कलाकारांनी संताप व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news