

पुढारी ऑनलाईन
बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला इंडस्ट्रीत तिच्या 'हॉट' असण्याबद्दलही ओळखली जाते. स्वतःचे बोल्ड फोटोज आणि व्हिडिओज ती सोशल मीडियात शेअर करत असते आणि सोशल मीडियात तिला मोठी फॅन फॉलोविंगही आहे. आताही उर्वशीच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियात खळबळ माजली आहे. तिच्या बोल्ड लूकमुळे ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या फोटोशूटमधील उर्वशीने परिधान केलेल्या ड्रेसवरून अनेकांच्या नजरा हटत नाहीत. खरेतर उर्वशीचा ड्रेस खूपच पारदर्शक आहे.
तथापि, या फोटोजमध्ये उर्वशी एखाद्या पोर्ट्रेटप्रमाणे भासते. उर्वशीच्या चित्रपटांबाबत बोलायचे तर ती आगामी काळात 'ब्लॅक रोज' या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय रणदीप हुडासोबत 'इन्स्पेक्टर अविनाश' या सीरिजमध्येही ती आहे.