indian idol marathi
मनोरंजन
इंडियन आयडॉल- मराठी पहिल्यांदाच सोनी मराठीवर
मुंबई; पुढारी ऑनलाईन : प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात सोनी मराठी वाहिनी नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता सोनी मराठी वाहिनी पहिल्यांदाच इंडियन आयडॉल – मराठी घेऊन येत आहे. इंडियन आयडॉल – मराठीमुळे स्पर्धकांच्या कलागुणांना वाव मिळेल. प्रेक्षकांचं मनोरंजनही होईल.
आयडॉलची आत्तापर्यंत अनेक पर्व झाली आहेत. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. त्यातून देशाला अनेक कलाकारही मिळाले आहेत. आता आयडॉल या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातला आवाज घराघरांत पोहोचणार आहे.
आपली कला सादर करण्यासाठी स्पर्धकांना हक्काचा मंच मिळणार आहे. सोनी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांना आयडॉल लवकरच पाहायला मिळणार आहे.

