मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबईची मराठी मुलगी सायली कांबळे इंडियन आयडल-१२ च्या अंतिम ६ स्पर्धकांमध्ये पोहोचली. पण, ती इंडियन आयडल-१२ या रिॲलिटी शोची विजेती होऊ शकली नाही. पण, तिचा इथेपर्यंत येण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता.
अधिक वाचा-
पहिल्या ६ स्पर्धकांमध्ये येणं खूप आव्हानात्मक होतं. अशी प्रतिक्रिया तिने बोलून दाखवली.
अधिक वाचा-
सायली कांबळेने स्वत: ही इच्छा बोलून दाखवली होती. जर ती या शोची विजेती झाली तर तिला आपल्या आई-वडिलांसाठी घर खरेदी करायचं आहे. या शोच्या विजेत्याला मिळणारी रक्कम ही २५ लाख रुपये आहे. तिला आपल्या आई-वडिलांसाठी एक स्पेशल गिफ्ट खरेदी करायचं आहे.
अधिक वाचा-
पण, ती या शोची विजेती होऊ शकली नाही. अखेर या शोचा विजेता पवनदीप राजन झाला.
सायलीच्या आईचे आजोबा संगीत शिक्षक होते. आईचाही आवाज सुंदर आहे. पण, आईला संगीत शिकता आलं नाही. माझा आवाज देवाने दिलेली देणगी आहे.
माझ्या आईकडून हा आवाज मला मिळाला आहे, अशी भावना तिने व्यक्त केली.
माझ्या वडिलांना किशोर कुमार फार आवडतात. त्यांचं नावही किशोर आहे. माझं गाणं म्हणताना जर काही चुकलं तर ते मल समजावून सांगतात.
सायलीला गाण्य़ात करिअर करायचं आहे, असं सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयातील सर्वांना चिंता होती. पण, कुटुंबीयांनी तिच्यावर विश्वास ठेवला.
जॉब कर, असं घरातील मंडळींचं म्हणणं हतं. स्पर्धा परीक्षांचाही तिने अभ्यास केला. पण, तिला गाण्यात करिअर करायचं होतं आणि त्या दिशेने तिने आपलं मार्गक्रमण सुरू केलं.
हेदेखील वचलंत का?