आलिया भट्टच्या लग्‍नाची खरेदी!

आलिया भट्टच्या लग्‍नाची खरेदी!

पुढारी ऑनलाईन : आलिया भट्ट एका फोटोमुळे सध्या चर्चेत आली आहे. ती आणि रणबीर कपूर एका साडी ब—ँडच्या सीईओ आणि डिझायनरबरोबर या फोटोमध्ये दिसून आले. हा फोटो पाहून चाहत्यांनी हे दोघे आता लग्‍नाच्या खरेदीला लागले असल्याचे म्हणण्यास सुरुवात केली.

डिझायनर बीना कन्‍नन यांच्यासमवेतचा हा फोटो बीना यांनीच सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यावरून नेटकर्‍यांनी आलिया-रणबीरच्या लग्‍नाबद्दल अंदाज बांधण्यास सुरुवात केली आणि काहींनी लग्‍नाचा जथ्थाही बांधून घेतला! सूत्रांचेही म्हणणे आहे की दोघे लवकरच लग्‍न करणार असून त्यासाठी त्यांनी शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. दोघांचा 'ब—ह्मास्त्र' हा चित्रपट सध्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news